सध्या चर्चा आहे ती आदिपुरुष चित्रपटाची. चित्रपटाचा टिझर आला त्या दिवसांपासून या चित्रपटाला घेऊन बरच भाष्य करण्यात आलं, म्हणजेच बरच ट्रॉल करण्यात आलं. मात्र त्यानंतर चित्रपटात बदल करून आज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील अजय अतुल यांच्या जय श्री राम या गाण्याने खऱ्या अर्थाने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवून ठेवली. चित्रपट प्रदर्शित झाला असून आता या चित्रपटातील एकेक पात्र समोर येत आहेत.(Marathi Celebrity In Adipurush)
दरम्यान चित्रपटात मराठी कलाकारांची वर्णी लागल्याचं दिसून येतंय. या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसणार आहे. शिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही रावणाच्या बहिणीची म्हणजेच शूर्पणखेच्या भूमिकेत आहे. यानंतर आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री चित्रपटात झळकल्याचं समोर आलंय.
पाहा कोण आहे कैकईच्या भूमिकेत (Marathi Celebrity In Adipurush)
छोट्या पडद्यावरून करिअरची सुरुवात केलेली तसेच मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री सोनाली खरे ही देखील आदिपुरुष चित्रपटात झळकली आहे. अभिनेत्री सोनाली खरे या चित्रपटात कैकयीच्या भूमिकेत दिसतेय. कैकयीच्या भूमिकेत सोनालीचा अभिनय पाहणं रंजक ठरतंय.(Marathi Celebrity In Adipurush)
हे देखील वाचा – “एक काळ गाजवणाऱ्या महानायकाला मिळत नाहीये काम” स्वतः व्यक्त केली खंत
सोनालीने आजवर छोट्या पडद्यावरून तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंच आहे. शिवाय तिने अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलं आहे. सोनाली सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोनाली सोशल मीडियावरून लेकीसोबतचे अनेक ट्रेंडिंग रील्स नेहमीच शेअर करताना दिसते. आता सोनालीच्या अभिनय कौशल्याची झलक आदिपुरुष या बिग बजेट चित्रपटातून पाहणं अर्थात रंजक ठरतंय.
