सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हमाली करणारा नवरा नको”, ‘बिग बॉस मराठी सीझन 6 मधील स्पर्धकाची संघर्षमय प्रेमकहाणी; म्हणाला, “तेव्हा पत्नीच्या घरच्यांनी नकार…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 16, 2026 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Roshan Bhajankar Love Story

'बिग बॉस मराठी सीझन 6 मधील स्पर्धकाची संघर्षमय प्रेमकहाणी

Roshan Bhajankar Love Story : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. घरात प्रवेश केल्यापासून अवघ्या काही दिवसांतच स्पर्धकांमधील मतभेद, वाद आणि टास्कमधील चढाओढ यामुळे शो चर्चेचा विषय ठरत आहे. कधी तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्यातील वाद, तर कधी तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यातील खटकेबाजी; यासोबतच विशाल कोटीयन आणि राकेश बापट यांच्यातील मतभेदांनीही घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कॅप्टन्सी पदासाठी सुरू असलेली चुरस आणि प्रत्येक स्पर्धकाचा वैयक्तिक प्रवास प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

अशातच ‘बिग बॉस मराठी’चा एक नवा प्रोमो समोर आला आहे, या प्रोमोमध्ये रोशन भजनकरने आपल्या प्रेमकथेचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावरून लोकप्रिय झालेला रोशन, घरात आपली गोष्ट सांगताना भावुक झालेला दिसतो. प्रोमोमध्ये किचन एरियात रोशन तन्वी कोलतेशी संवाद साधताना आपलं लव्ह मॅरेज झाल्याचं सांगतो. तो म्हणतो, “त्या वेळी खूप लोक पळून जात होते. आपणही पळून जाऊया, असं माझी पत्नी म्हणत होती. पण मी तिला नाही म्हणालो. मी तिच्या घरी गेलो. तिच्या घरच्यांनी मला टोमणे मारले. लग्नासाठी नकार दिला. ‘तू हमाली करतोस,’ असं ते म्हणाले. तेव्हा मी माझ्या बायकोला सांगितलं की तू ठाम राहा. हे जे बोलणारे आहेत, त्यांची बोलती मी बंद करतो.” अशा शब्दांत त्याने आपली प्रेमकथा सांगितली आहे.

आणखी वाचा – “तन्वीने स्वतःचे रंग दाखवले…”; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा तन्वी कोलतेवर संताप अनावर, म्हणाली, सागर कारंडेवर जोरात ओरडली…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रोशन भजनकर दोन मुलींचा पिता आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात त्याची एन्ट्री होताच, टीव्हीवर त्याला पाहून त्याच्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू आले होते. घरची आर्थिक परिस्थिती साधी असतानाही, गेली अनेक वर्षे तो सिमेंटची पोती उचलण्याचं काम करत आहे. ‘अमरावतीचा बॉडीबिल्डर’ अशी त्याची वेगळी ओळख असून, कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर त्याने हा प्रवास यशस्वीपणे घडवून आणला आहे.संघर्ष, प्रेम आणि आत्मविश्वास यांची सांगड घालणारी रोशन भजनकरची ही कथा सध्या प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. तुम्हाला रोशनची ही प्रेमकहाणी कशी वाटली? तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की कळवा.

आणखी वाचा – हलव्याचे दागिने, पारंपरिक कपडे अन्…; अंकिता वालावलकरची पहिली संक्रांत, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “३५० बायकांसाठी…”

Tags: Bigg Boss Marathi 6marathi entertainment newsRoshan Bhajankar Love Story
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Bigg Boss Marathi 6

"सागर कारंडे यांना 'कॉमेडी करतो तू?", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला सुनावलं, म्हणाली, "काय बोलतोय याचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.