गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचं पोस्टर समोर, पूजा सावंत, किरण गायकवाड, अक्षय टंकसाळे यांच्या लक्षवेधी भूमिका

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2025 | 3:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ambat Shaukin Movie Poster

मल्टीस्टारर 'आंबट शौकीन' चित्रपटाचं पोस्टर समोर, पूजा सावंत, किरण गायकवाड, अक्षय टंकसाळे यांच्या लक्षवेधी भूमिका

Ambat Shaukin Movie Poster : मराठी चित्रपटसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट येत असताना आणखी एका मराठमोळ्या चित्रपटाच्या हटके पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधलं. प्रत्येक कलाकाराने डोळ्यावर पट्टी ठेवून आता लवरे लागणार असं लिहिलेली पाटी हातात घेत पोस्ट शेअर केल्या आहेत. तेव्हापासून हा नवा कोरा आंबट शौकीन हा चित्रपट काय आहे, थोडीशी बोल्ड असलेली भाषा नेमकी का वापरलीय असे अनेक प्रश्न पडले. आणि आता अखेर ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचं पोस्टर समोर आलं. या पोस्टवरील कलाकारांनी तर चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढविली आहे. ‘हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट’, ‘एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स’, ‘लॅब्रोस एंटरटेनमेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून या भन्नाट विनोदी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे व किरण गायकवाड या तीन मित्रांची अतरंगी कहाणी पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही पाहायला मिळत असून या चित्रपटात तिची काय भूमिका असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या चौघांसह या चित्रपटात आणखी मोठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – सतत रडते, स्पर्धकांची दाखवलेली गरिबी आणि…; रिएलिटी शोमध्ये होणाऱ्या ड्रामावर गीता कपूरचा मोठा खुलासा, स्क्रिप्टेड असणं…

View this post on Instagram

A post shared by Majja Official (@its.majja)

प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, “‘आंबट शौकीन’ ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या तीन मित्रांची गंमतीशीर सफर या सिनेमातून दाखवली आहे. हा चित्रपट हास्य, विनोदने प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. तसेच चित्रपटाला लाभलेल्या उत्तम कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”.

आणखी वाचा – ‘समसारा’ चित्रपटाचे युनिक पोस्टर समोर, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग, उत्सुकता वाढली

चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे

Tags: ambat shaukinAmbat Shaukin Movie Postermarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Nawazuddin Siddiqui On Bollywood

“बॉलिवूड इंडस्ट्रीच चोर आहे, इथे फक्त...”, नवाजुद्दीने सिद्दीकीचा धक्कादायक दावा, म्हणाला, “यांची क्रिएटिव्हीटी तर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.