गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘समसारा’ चित्रपटाचे युनिक पोस्टर समोर, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग, उत्सुकता वाढली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2025 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
samsara marathi movie poster

'समसारा' चित्रपटाचे युनिक पोस्टर समोर, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग, उत्सुकता वाढली

Samsara New Marathi Movie : सध्या मराठी सिनेसृष्टीत चित्रपटांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक मराठी चित्रपट पेक्षकांच्या भेटीस येताना दिसत आहेत.अशातच अत्यंत वेगळ्या धाटणीचा, दमदार स्टारकास्ट असलेला एक नवाकोरा चित्रपट या मराठी चित्रपटांच्या यादीत येणार असल्याचं समोर आलं आहे. चित्रपटाचं युनिक असं पोस्टर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवत आहे. “समसारा” हा चित्रपट २० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं अतिशय धीरगंभीर असं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं असून, ‘समसारा’ सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय चित्रपट ठरणार असल्याचं यावरुन दिसतंय.

‘देव, दानव, असुर, मानव यांच्यातला एक पडला तरी दुसरा उभा राहतो. हे चक्र सुरु राहतं. पण हे चक्र थांबवायला काळ स्वतः जागा होतोय. आम्ही येतोय….’ असे शब्द धीरगंभीर आवाजात ऐकू येतात आणि त्यातून समसारा चित्रपटाचं पोस्टर साकारलं आहे. अत्यंत कल्पक असं हे पोस्टर असून, त्यातून चित्रपटाच्या कथानकाचा नेमका अंदाज बांधता येत नाही. अतिशय सूचक अशा प्रकारचं हे पोस्टर आहे. त्यामुळे दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘समसारा’ या चित्रपटाविषयी उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनी बाबा झाला दत्तू मोरे, घरी चिमुकल्याचं आगमन, पहिला फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Majja Official (@its.majja)

संचय प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समसारा’ची निर्मिती पुष्कर योगेश गुप्ता यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सागर लढे यांनी सांभाळली आहे. कथा सागर लढे, विश्वेश वैद्य आणि समीर मानेकर यांची असून, पटकथा सागर लढे आणि समीर मानेकर यांनी लिहिली आहे. तर समीर मानेकर, निहार भावे यांनी संवादलेखन केलं आहे. विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावत आहेत. सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

आणखी वाचा – दोन लेकींनंतर पुन्हा मुलीलाच दिला जन्म, आई-वडील रुग्णालयातच सोडून गेले अन्…; डॉक्टरांनी असं काही केलं की…

कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी यांनी काम सांभाळलं आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २० जूनपर्यंत प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.

Tags: marathi actorssamsara marathi movieSamsara New Marathi Movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
indian idol 12 winner pawandeep rajan accident

Video : ‘इंडियन आयडल १२’चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात, गायकाची रुग्णालयातील अवस्था पाहून ओळखणंही कठीण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.