बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. मुंबईत जन्म झालेल्या या अभिनेत्रीला मराठी संस्कृतीविषयी प्रचंड प्रेम आहे. आणि हे प्रेम ती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसमोर नेहमीच दाखवत असते. ती नेहमीच मराठी कविता, गाणी सादर करते. इतकेच नव्हे तर अगदी तिच्या मराठमोळ्या पोशाखाचे फोटोजही चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडतात. याच अदाचा खास मराठमोळा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. (Adah Sharma Nauwari look)
अभिनेत्री अदा शर्मा काही दिवसांपूर्वी एका दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती. यावेळी अदाने खास मराठमोळा साज चढवला होता. नऊवारी साडी, नाकात नथ आणि पायात शूज असा हटके लूक तिने या कार्यक्रमात केला होता. “काष्टा साडी, नथ आणि शूज कसा वाटला माझा लूक? ही माझ्या आजीची साडी आहे.”, असं अदाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
हे देखील वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या नातवाचं बारसं थाटामाटात पार, पाहा शाही सोहळ्याची खास झलक
मात्र, या नऊवारी साडीवर तिने शूज का घातले? याचे कारण सांगताना अदा लिहिते, “माझी मैत्रिणीने मला यावर शूज घालायला सांगितले. पण माझ्याकडे काळ्या रंगाचे शूज होते, तेव्हा मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीचे शूज घातले. मला माहित नव्हतं की, ही साडी नेसून जवळपास १ किलोमीटरपर्यंत चिखलातून चालावं लागणार आहे. त्यामुळे मी तिचे मनापासून आभार मानते.”, असं अदा या पोस्टमध्ये म्हणाली. तिच्या या मराठमोळ्या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा – वडील महेश भट्ट यांच्याबरोबर लिपलॉक करण्यावरून पहिल्यांदाच बोलली पूजा भट्ट, म्हणाली, “असं पुढेही…”
अभिनेत्री अदा शर्मा याआधी अनेक हिंदी व अन्य भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा झळकली होती. ज्यात तिच्या भूमिकेचे सिनेरसिकांनी प्रचंड कौतुक केले होते. दरम्यान, चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरल्यावर अभिनेत्रीने मराठीतून पोस्ट शेअर करत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले होते.