टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा’ हा कार्यक्रम अधिक लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमाने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यामधून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा अधिक प्रकाशझोतात आला. या शोबरोबरच अनेक चित्रपटांमध्येही भूमिका साकारताना दिसला आहे. सध्या ओटीटीवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसून येत आहे. या कार्यक्रमाचे नवीन पर्व पलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिल हा सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेला दिसून येतो. तो अनेकदा स्वतःचे स्टायलिश लूकमधील फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करतो. (kapil sharma new post)
कपिल आपल्या कुटुंबाबरोबर अनेकदा वेळ घालवत असतो. कुटुंबियांबरोबरचे फोटो त्याच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. अशातच त्याचा एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो त्याच्या पत्नीबरोबर खासगी विमानातून उतरताना दिसत आहे. यामध्ये दोघंही खूप स्टायलिश दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी व कलाकारांनी अनेक प्रतिक्रियादेखील केल्या आहेत.
या फोटोवर अभिनेत्री भारती सिंह, करण टॅकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, “तुम्ही तर कॉमेडी करुन श्रीमंट झालात”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुम्ही तर मजे मजेमध्ये श्रीमंत झालात आणि आम्ही इथे गंभीर राहून पण नाही झालो अजून”. कपिल नेहमीच कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसतो. ‘द ग्रेट…’चे पहिले पर्व संपताच सुट्ट्यांसाठी तो कॅनडाला निघून गेला होता. तेथील अनेक फोटोदेखील समोर आले होते. त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा या शोच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. तसेच चित्रीकरणदेखील सुरू झाले आहे.
‘द ग्रेट…’च्या टीमने नुकताच सोशल मीडियावर शोचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. प्रोमोमध्ये कपिलने अर्चना पूरण सिंह, सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा व राजीव ठाकूर दिसणार आहेत. लवकरच सेलेब्रिटी गेस्ट व मनोरंजन करण्यास हा कार्यक्रम भेटीस येणार आहे. तसेच कपिलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘क्रू’ या चित्रपटांमध्ये तो तब्बूच्या नवऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसून आला होता. तसेच आता ‘किस किस को प्यार करु २’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.