Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, अर्जुन-सायलीची वाट पाहत असतो. हिरवा रंग आवडल्यामुळे सायली आता हिरव्या रंगाची साडी नेसून खाली येईल का याकडे अर्जुनचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मात्र, सायली जेव्हा अर्जुनच्या समोर येते तेव्हा तिने गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते. हे पाहून अर्जुनचा हिरमोड होतो. अर्जुन खूपच नाराज होतो. मिसेस सायलीने असं का केलं असं अर्जुनला कळत नाही आणि तो मिसेस सायलींना बघून तडका फडकी तिथून रुममध्ये निघून जातो. तर इकडे सायलीला काळजी वाटत असते की हिरव्या रंगाचा मी असा कोणता पदार्थ बनवू जो पाहून अर्जुन खूप खुश होईल. यासाठी ती विचार करत असते आणि ती पालकचे थालीपीठ बनवायच ठरवते.
त्यानंतर तर इकडे एकीकडे रविराज प्रतिमाला तिचा मारेकरी शोधण्यासाठी मदत करत असतो आणि तो तिला विचार करायला सांगतो. मात्र प्रतिमाला काहीच आठवत नाही. प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते हे पाहून नागराज आणि तन्वी यांच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुन जेव्हा त्याच्या रुममध्ये बसलेला असतो तेव्हा चैतन्य देखील तिथे असतो. दोघांनाही कळत नाही की, सायलीने असं का केलं. त्यानंतर सायली नाश्तासाठी बोलवायला येते तेव्हा अर्जुन भूक नसल्याचे कारण सांगतो आणि नाश्ताला येणार नसल्याचे सांगतो आणि चैतन्यला जेवायला खाली जायला सांगतो.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अनुष्काचा किर्लोस्करांविरोधात मोठा डाव, पारू-आदित्यच्या नात्याचं सत्य येणार का समोर?
त्यानंतर सायली खाली निघून जाते, तर इकडे नागराज आणि प्रिया बोलत असतात तेव्हा नागराज सांगतो की आजच्या आज आपण प्रतिमाचा हिशोब करायला पाहिजे. नाहीतर हिने जर का सत्य उघडकीस आणलं तर आपण सुद्धा या महीपत बरोबर अडकू. तर रविराजच्या म्हणण्यानुसार प्रतिमा तिच्या मारेकराला डोळ्यासमोर घेऊन येते आणि ती स्केच आर्टिस्टला सांगू लागते. तर इकडे चैतन्य अर्जुनला सांगतो की, अर्जुन तू काही खाल्लं नाही आहेस म्हणून सायली वाहिनीने सुद्धा काही खाल्लं नसेल. तू जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत सायली सुद्धा जेवणार नाही त्यामुळे तू काहीतरी खाऊन घे. मात्र पोटात काही नसल्याने अर्जुनची ऑफिसला जातानाही चिडचिड सुरु असते.
अर्जुनला कळतच नाही की, मिसेस सायलींच्या मनात नेमकं काय सुरु आहे आणि ते कसं जाणून घ्यायचं. आपल्या मनातलं त्यांना कसं सांगायचं यासाठी दोघांचे आटोक्याचे प्रयत्न सुरु असलेले पाहायला मिळतात. आता हे दोघं एकमेकांसमोर केव्हा प्रेमाची कबुली देणारी याकडे प्रेक्षक मंडळींच्या ही नजरा लागून राहिलेल्या आहेत.