Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे अनुष्काचा खरा चेहरा मालिकेत समोर आलेला पाहायला मिळतोय. अनुष्काही दिशाची बहीण असल्याचे सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. तर दिशा जेलमध्ये असल्याने तिचे वडील चिंता व्यक्त करताना दिसतात. तेव्हा अनुष्का सांगते की, ‘बाबा तू धीर धर. मी आले आहे ना. आता मी सगळं काही सरळ करते आणि त्या किर्लोस्कर कुटुंबाला नेस्तनाबूत करीन, दिशाला सोडा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बरेचदा विनवणी केली पण त्यांनी काही ऐकलं नाही’. त्यानंतर दिशांचे आणि अनुष्काचे बाबा म्हणतात की, ‘त्यांच्यामुळेच माझी दिशा जेलमध्ये गेली आहे आणि त्या धक्क्याने माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आहे’. यावर अनुष्का सांगते की, ‘आता मी आले आहे तर सगळं काही सुरळीत होईल. त्यानंतर पारू तिच्या घरी असते तेव्हा मारुती पैसे मोजत असतो. पारू मारुतीला विचारते की, एवढे पैसे घेऊन कुठे चालला आहेस. तेव्हा मारुती सांगतो की, माझ्या मित्राला अडचण आहे म्हणून मी त्याला हे पैसे उधारीवर देत आहे’. त्यानंतर मारुती थेट मंदिराच्या पाठीमागे जातो आणि तिथे एका गुरुजींना वीस हजार रुपये देतो आणि सांगतो की, ‘माझ्या मुलीचं आता सर्व काही ठीक होईल ना?, आता ही पूजा करावी लागेल का?’, तेव्हा गुरुजी सांगतात की, ‘आता ही पूजा करावी लागेल मात्र ती पूजा मी हिमालयात जाऊन करणार आहे. त्यामुळे तिथे मला कोणीच नकोय’, असं सांगून तो पैसे घेऊन जातो. हा लबाड गुरुजी असतो हे मारुतीला अजून कळालेलं नसतं.
तर इकडे अहिल्यादेवी देवीची घरात पूजा करत असतात, तेव्हा पारू देखील तिथे असते. तेव्हा पारू सांगते की, माझा डावा डोळा फडफडत आहे.यावर अहिल्यादेवी सांगतात, म्हणजे तुझ्या घरात काहीतरी चांगलं होणार आणि तितक्यात अहिल्यादेवींना फोन येतो आणि फोनवरुन कळविण्यात येते की, आदित्यला उत्कृष्ट व्यावसायिकाचा जगभरात पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांची कंपनी पहिल्या टॉप पाचमध्ये सुद्धा आली आहे. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी खूपच खुश होतात आणि त्या पारुला म्हणतात की, अगं पारू डावा डोळा तुझा फडफडत होता पण बातमी आमच्या घरी चांगली आली. तितक्यात अनुष्का तिथे येते. अनुष्काला पाहून त्या म्हणतात, मग माझी सून लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि ही गोड बातमी मला मिळाली. आताच्या आता सगळ्यांना खाली हॉलमध्ये बोलव मला सगळ्यांना गुड न्यूज सांगायची आहे असं अहिल्या पारूला सांगते आणि त्यानंतर अहिल्यादेवी सगळ्यांसमोर आदित्य कसा आहे असा प्रश्न विचारते आणि न राहून आदित्यला उत्कृष्ट व्यावसायिकाचा अवॉर्ड घोषित झाला असल्याचं सांगते.
त्यानंतर पारू मिठाई घेऊन येते आणि सावित्रीलाही गुड न्यूज सांगते. पारू मिठाई घेऊन येते तेव्हा अहिल्यादेवी अनुष्काला ती मिठाई आदित्यला भरवायला सांगते. आदित्यला मिठाई भरवून झाल्यानंतर अहिल्यादेवी अनुष्काला आणखी एका व्यक्तीला मिठाई भरवायला सांगते ती म्हणजे पारू. कारण पारूला सुद्धा उत्कृष्ट ब्रँड अँबेसेडर हा अवॉर्ड घोषित झालेला असतो आणि हा अवॉर्ड पारू व आदित्यला एकाच सेरेमनीमध्ये देण्यात येणार असल्याचे सांगतात. हे ऐकल्यावर सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर अनुष्काला फारच चिड येते. अनुष्का पारुला मिठाई भरवते आणि तिच्या गालाला जोरात चिमटा काढते आणि बोलते तू खूपच नाजूक आहेस. अनुष्का आता तिथे रूप दाखवायला सुरुवात करते. आता हे सगळ्यांच्या लक्षात येईल का? हे अजून समोर आलेलं नाहीये.
तर पारू सावित्रीला सांगायला येते तेव्हा सावित्री सांगते की, अनुष्का मॅडम आणि आदित्य सरांचं लग्न होण्याआधी तू तुमचं सत्य सगळं काही सांगून टाक. तू आदित्य सरांना नवरा मानतेस आणि त्यांना तुझी किती गरज आहे हे सगळ्यांना कळायला हवं. मात्र पारू सांगते की, मी आदित्य सरांवर कोणतंच बंधन लादणार नाहीये. इतक्यात तिथे दामिनी येते आणि ती विचारते, तू आदित्य वर काय लादणार नाहीयेस?, हे ऐकल्यावर पारू शांत होते. आता दामिनीने सगळं काही ऐकलं असेल का?, दामिनी पारूचं सत्य सर्वांसमोर आणेल का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.