अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा २’ सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये जोरदार चर्चा असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच आता या चित्रपटासंबंधित एका अभिनेत्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनच्या भावाची भूमिका साकारुन प्रसिद्ध झालेला तेलुगू अभिनेता श्री तेजवर लग्नाच्या वचनबद्धतेच्या बहाण्याने भावनिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका महिलेने या अभिनेत्याविरोधात हैदराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण? (Shritej Accused Of Exploitation)
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पुष्पा स्टार श्रीतेजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी कुकटपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. श्रीतेजने लग्नाचे आमिष दाखवून २० लाख रुपयांची आर्थिक मागणी केली, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिच्याबरोबर रिलेशनशिप असूनही अर्चना नावाच्या दुसऱ्या महिलेबरोबरही त्याचे संबंध होते आणि तिच्यापासून त्याला सात वर्षांचा मुलगाही असल्याचा दावा तिने केला आहे.
आणखी वाचा – ऐश्वर्या रायने ‘बच्चन’ आडनाव काढले? दुबईमधील ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण, नात्यातील तणाव आणखी वाढला
पीडितेने असाही आरोप केला आहे की, तिने प्रथम या वर्षी एप्रिलमध्ये तक्रार दाखल केली होती, परंतु अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी तिला या प्रकरणी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले गेले होते. त्यामुळे महिलेने ही तक्रार मागे घेतली होती. यापूर्वी माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचा दावा तिने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता योग्य ते पुरावे शोधून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तपास सुरु केला आहे. याच पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अभिनेता श्रीतेज विरुद्ध बीएनएस ६९, ११५ (२), आणि ३१८(२) सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! रेश्मा शिंदेच्या हातावर रंगली मेहंदी, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल
दरम्यान, श्रीतेजला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश यांची पत्नी अर्चना यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्याने ते यापूर्वी वादात सापडले होते. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘पुष्पा’, ‘वांगवेती’, ‘धमाका’, ‘मंगलवरम’ आणि ‘बहिष्करण’ यांसारख्या प्रसिद्ध तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकांद्वारे श्रीतेजने इंडस्ट्रीत आपली छाप पाडली आहे. मात्र कायदेशीर अडचणीत अडकल्याने त्यांची प्रतिमा खराब झाली आहे.