Tharla Tar Mag Serial New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सायली व अर्जुन यांच्यात दुरावा आला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर सुभेदार कुटुंबीयांनी अर्जुन व तन्वीच लग्न लावायचा मोठा निर्णय घेतला आहे. अशातच अर्जुन व सायलीने एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे अर्जुन फार काळजीत दिसत आहे. मात्र घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याला कोणतंही पाऊल उचलायचं नाही आहे. अर्जुन नकार देतो तेव्हा पूर्णा आजींची तब्येत बिघडते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेलं जातं. त्यामुळे अर्जुनने नाईलाजास्तव तन्वीबरोबर लग्नास होकार दिलेला असतो.
पूर्णा आजीची तब्येत बिघडल्याचं पाहून सर्वजण तिला रुग्णालयात दाखल करतात. याठिकाणी आजी अर्जुनकडून ‘तन्वीबरोबर लग्न कर’ असं वचन घेते. तर एकीकडे प्रिया तिचे नवनवीन डाव आखत सुभेदार कुटुंबियांच्या मनात घर करते. अर्जुन आजीची प्रकृती पाहून तन्वीबरोबर लग्न करण्यास मनाविरुद्ध वचन देतो. एवढ्यात प्रतिमा आत्या रुग्णालयात येतात. अर्जुनने पूर्णा आजीला लग्नाचं वचन दिलं हे ऐकून प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो.
अर्जुन रागारागात घरी येतो तेव्हा चैतन्यला अर्जुनचा रागावलेला, पडलेला चेहरा पाहून काळजी वाटते. अर्जुन सायलीच्या आठवणीत भावुक झालेला असतो. यावर चैतन्य तोडगा म्हणून अर्जुनला सायलीला फोन करायला सांगतो. त्याचवेळी चैतन्य व अर्जुनच बोलणं तन्वी ऐकते. तेव्हा प्रिया ठरवून सायलीला या सगळ्याचा जाब विचारायला जायचं ठरवते. मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, यामध्ये प्रिया सायलीला जाब विचारताना दिसत आहे.
आणखी वाचा – सैफ अली खान हल्ल्याप्रकरणात पश्चिम बंगालमधून महिलेला अटक, मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष, म्हणाले, “गोंधळ…”
मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रिया सायलीला म्हणते, “तू डोक्यावर पडली आहे का गं? सायली तुझा घटस्फोट होणार आहे. कायद्याने तुमचं नातं आता संपलंय. फिनिश! आता कायद्याने अर्जुनची बायको मी होणार आहे”. यावर सायली प्रियाला चोख उत्तर देत स्वत:ची बाजू स्पष्ट करताना दिसतेय. ती म्हणते, “कायद्याने आमचा घटस्फोट होईल. पण, मी पुन्हा त्यांच्याशी लग्न करेन. काहीही झालं तरी ते स्थान मी तुला मिळू देणार नाही”.