शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या उद्घाटनासाठी मराठी कलाकरांमध्ये उत्साह, शशांक केतकर म्हणाला, “१९६३ पासून रखडलेल्या…”  

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 12, 2024 | 3:42 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
Marathi celebrities excited for atal setu singers Vaishali Samant, Swapnil Bandodkar, Avadhoot Gupte will perform launch event

शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या उद्घाटनासाठी मराठी कलाकरांमध्ये उत्साह, शशांक केतकर म्हणाला, “१९६३ पासून रखडलेल्या…”

भारतात समुद्रावर बांधण्यात आलेल्या सर्वात लांब पुलाचे म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या महामार्गाचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू असं नाव या पुलाला देण्यात आलं आहे. भारतातील सर्वात लांब समुद्रावरचा पूल असलेल्या प्रकल्पासाठी १७ हजार ८४० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  

या अटल सेतूमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला लागणार वेळ हा अधिक पटीने वाचणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर २० मिनिटात पार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. यावर मराठीतील काही कलाकारांनीही आनंद व्यकात केला आहे. स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता शशांक केतकरने त्याच्या सोशल मीडियाद्वारे या अटल सेतूचा एक खास व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

हेही वाचा – प्रसिद्ध गायक सनम पुरीचा शाही विवाहसोहळा संपन्न, गर्लफ्रेंडसह थायलँडमध्ये केलं लग्नं, पाहा खास फोटो  

शशांकने अटल सेतूचा व्हिडीओ शेअर करत असे म्हटले आहे की, “१९६३ पासून रखडलेल्या सागरी सेतूचा प्रकल्प मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात हिरीरीने हाती घेतला आणि आज १२ जानेवारी २०२४ रोजी, त्याच महाकाय अशा अटल सेतूचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.” असं म्हटलं आहे. अभिनेत्री शिवानी बावकरनेदेखील हा खास व्हिडीओ शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vaishali Joshi Samant (@vaishalisamant)

हेही वाचा – Bigg Boss 17 : “माझा भाऊ शोमध्ये खूप रडला”, ‘बिग बॉस’च्या घरात येताच मुन्नवरच्या बहिणीचे वक्तव्य, म्हणाली “आमच्या कुटुंबाची…  

तर मराठीतीतील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते व बांदोडकर यांच्यासह गायिका वैशाली सामंत हे या अटल सेतूच्या उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी गाणार आहेत. गायिकेने तिच्या सोशल मीडियाद्वारे हा खास फोटो शेअर करत आनंद व्यक्त केलं आहे. यावेळी कलाकारांनी त्यांचे हे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

Tags: स्वप्नील बांदोडकरअटल सेतू लोकार्पणअटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूअवधूत गुप्तेशिवानी बावकरशशांक केतकरमराठी मनोरंजनमराठी कलाकारमराठी बातमीवैशाली सामंतAtal Bihari Vajpayee Shivdi Nhava Sheva Atal SetuAtal Setu LaunchAvadhoot Gupte Shashank KetkarMarathi artistmarathi entertainmentmarathi entertainment newsShivani BawkarSwapnil BandodkarVaishali Samant
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Tharla tar mag, premachi goshta, tujhech mi geet gaat ahe marathi star pravah serial trp see the details

टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ मालिकेची बाजी, पण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग घसरला, पाहा संपूर्ण यादी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.