Ar Rahman Health Update : ऑस्कर विजेता संगीतकार एआर रेहमान यांच्या तब्येतीबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे त्यांना चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या निगराणीखाली असलेले एआर रेहमान आता ठीक आहेत आणि आपल्या घरी परत आले आहेत, ज्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. १६ मार्च रोजी त्यांच्या अचानक छातीत दुखणे सुरु झाले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता सर्व काही ठीक आहे. ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. त्यांची पत्नी सायरापासून विभक्त झाल्याच्या बातमीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. परंतु जेव्हा त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर आली तेव्हा प्रत्येकजण अस्वस्थ झाला.
असे सांगितले जात होते की, गायकाची अँजिओग्राफी होऊ शकते कारण त्याच्या छातीत दुखत आहे, मात्र याबाबत खरी अपडेट समोर आलेली नाही. एआर रेहमान यांच्या व्यवस्थापकाने मात्र १६ मार्चच्या संध्याकाळी आरोग्य अद्यतने दिली होती. असे सांगण्यात आले की त्याच्या छातीत नव्हे तर गळ्यात वेदना होत आहे, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात आणले गेले. मॅनेजरने सांगितले की गायकाला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या काही चाचण्या झाल्या आणि काही तासांनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. ते आता पूर्णतः ठीक आहेत.
आणखी वाचा – घरात कापूरचा वापर केल्यास खरंच सकारात्मक उर्जा मिळते का?, शास्त्र काय सांगतं?
खरं तर, एआर रेहमान यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांची पत्नी सायरा बानो यांनी एबीपी न्यूजला व्हॉईस नोट पाठविली आहे. ज्यामध्ये त्या म्हणाला, “आसलम वालेकम, मी सायरा रहमान बोलत आहे. एआर रेहमान शक्य तितक्या लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मला अशी बातमी मिळाली की त्याला छातीत दुखत आहे आणि एंजिओप्लास्टी होणार आहे. अल्लाहच्या आशीर्वादाने ते आता ठीक आहेत”. सायरा पुढे म्हणाली की, “मला असेही म्हणायचे आहे की, आम्ही अधिकृतपणे घटस्फोट घेतला नाही, आम्ही अजूनही पती -पत्नी आहोत. माझ्या आरोग्याच्या कारणास्तव आम्हाला वेगळे व्हावे लागेल. गेल्या दोन वर्षांपासून, माझे आरोग्य योग्य नव्हते आणि मला त्यांना जास्त ताण द्यायचा नव्हता”.
आणखी वाचा – अंत्यसंस्कारांवरून घरी येताच अंघोळ करणं गरजेचंच आहे का?
रेहमानची पत्नी म्हणाली, “कृपया, माध्यमांना अशी विनंती आहे की, मला ‘पूर्वाश्रमीची पत्नी’ असं संबोधू नका. फक्त एकच गोष्ट अशी आहे की आम्ही वेगळे आहोत परंतु माझ्या प्रार्थना नेहमीच त्यांच्याबरोबर आहेत. मला त्यांच्या कुटुंबाला अधिक ताण द्यायचा नाही आहे आणि त्यांनी त्यांची काळजी घ्यावी असे मला वाटते”.