Monika Dabhade Shared Goodnews : अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. विशेषतः त्यांच्या आयुष्यातील अनेक अपडेट, चांगल्या-वाईट गोष्टी ते नेहमीच चाहत्यांसह शेअर करतात. अशातच मालिकाविश्वातील एका खलनायकी चेहऱ्याने तिच्या चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘ठरलं तर मग’ फेम अस्मिता म्हणजेच मोनिका दाभाडे. मोनिका लवकरच आई होणार असल्याचं तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
‘ठरलं तर मग’ ही मालिका मराठी टेलिव्हिजन विश्वातील नंबर १ मालिका आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये जुई गडकरी व अमित भानुशाली मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान मालिकेतील सायली-अर्जुन या पात्रांवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केलंच आहे, मात्र यामध्ये असणाऱ्या नकारात्मक पात्रांनीही प्रेक्षकांचे मन जिंकले. यामध्ये असेच एक नकारात्मक बाजू असणारे पात्र म्हणजे ‘अस्मिता’. हे पात्र मोनिका दाभाडे साकारताना दिसत आहे. नेहमीच सायली विरोधात जाऊन कट कारस्थान करण्याचा अस्मिताचा प्रयत्न मालिकेत पाहायला मिळतोय.
मोनिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. इतकंच नव्हे तर मोनिकाच स्वतःच असं युट्युब चॅनेलही आहे. ज्यावर ती अनेकदा व्लॉगिंग करताना दिसते. आता आई होणार असल्याची आनंदाची बातमी तिने इस्टाग्रामद्वारे दिली आहे. यावेळी तिने नवऱ्याबरोबर पोज देत हातात लहान बाळाचे शूज असलेला फोटो शेअर केला आहे.
मोनिका दाभाडे व चिन्मय कुलकर्णी यांच्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत. फेब्रुवारी महिन्यात मोनिकाने त्यांच्या लग्नानंतरच्या नवव्या वाढदिवसाचा vlog शेअर केला होता. आता अभिनेत्री तब्बल नऊ वर्षांनी आई होणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. मोनिकाने ही गुडन्यूज शेअर करताच अनेकजण तिच्या या फोटो पोस्टला पसंती दर्शविताना दिसत आहेत.