Alia Bhatt And Ranbir Kapoor Daughter Raha 2nd Birthday : रणबीर कपूर व आलिया भट्ट यांनी त्यांची मुलगी राहा हिच्या दुसऱ्या वाढदिवसाचे अनेक इनसाइड फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बर्थडे पार्टीची थीम आणि केकची झलक याच बरोबर पार्टीतील पाहुण्यांचा माहोलही दिसत आहे. मात्र, आलियाने हे फोटो शेअर केलेले नाहीत. तर आलियाची आई सोनी राजदानने तिच्या मैत्रिणींबरोबर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये नीतू कपूर, नीना गुप्ताही दिसत आहेत. याशिवाय राजदानने इन्स्टास्टोरीवर या पार्टीच्या काही झलकही दाखवल्या आहेत, ज्यामध्ये राहाचे आजोबा महेश भट्ट पोज देताना दिसत आहेत. यावेळी राहाच्या बर्थडेच्या केकचा फोटोही शेअर केला आहे.
राहाच्या वाढदिवसाच्या केकमध्ये गोंडस प्राणी आणि पानांच्या आकृत्या आहेत. या केकवर ‘हॅपी बर्थडे’ आणि ‘राहा २’ असे लिहिले आहे. मात्र, सोनी राझदानच्या इन्स्टा पोस्टमध्ये नीना गुप्ताची झलक पाहिल्यानंतर लोकांनी तिच्यावर टीका केली आहे. याशिवाय आलिया भट्टची बहीण पूजा भट्टनेही या पार्टीला हजेरी लावली होती. पूजाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बर्थडे पार्टीचे काही फोटोही शेअर केले आहेत. केक, वाढदिवसाची थीम आणि सजावट याशिवाय टॅटूची झलकही या फोटोंद्वारे दाखवण्यात आली आहे.
या पार्टीत काल रात्री करण जोहर त्याची मुले यश व रुहीबरोबर पोहोचला. करीना कपूर खानने तिचा धाकटा मुलगा जहांगीर अली खानबरोबर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. याशिवाय आलिया-रणबीरचा जवळचा मित्र अयान मुखर्जीही या पार्टीत सहभागी झाला होता. बेबोने राहाच्या वाढदिवसानिमित्त आलिया, राहा आणि रणबीरला तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक सुंदर फोटो शेअर करुन शुभेच्छाही दिल्या होत्या.
रणबीर कपूर व आलिया भट्ट ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आई-वडील झाले. सुमारे एक वर्षानंतर, गेल्या ख्रिसमसला, त्यांनी त्याच्या चाहत्यांना आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली. यानंतर राहा जेव्हाही घराबाहेर पडली तेव्हा तिला पापाराझीच्या कॅमेऱ्यांनी कैद केले. राहा कॅमेरा फ्रेंडली आहे आणि पापाराझींना पाहताना अनेकदा चेहऱ्याचे हावभाव बदलते.