अक्षय्य तृतीतेला नवीन खरेदी करण्याचा किंवा काही शुभ कर्णीचा योग असतो. अक्षय्य तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्यामुके या दिवशी अनेकजण नवीन सोने किंवया शुभवस्तु विकत घेत हा दिवस साजरा करतात. मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनीदेखील कालच्या अक्षय्य तृतीयेनिमित्ताने शुभवार्तांची घोषणा केली. अशातच काल (१० मे) रोजी ठरलं तर मग फेम अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केली.
काही दिवसांपूर्वी ‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव झळकली होती. याच रुचिराने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आई-वडिलांना खास सरप्राइज दिलं. काल (१० मे) अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रुचिराने आई-वडिलांना खास सरप्राइज देण्यासाठी आलिशान गाडी खरेदी केली. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच व्हायरल झाली आहे.
या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा. माझ्या सुवर्थरथाचं आर.जे.च्या (रुचिरा जाधव) विश्वात स्वागत करत आहे. या सुवर्ण दिवशी माझ्या आई-वडिलांसाठी हे खास सरप्राइज.” अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आलिशान गाडी पाहायला मिळत आहे. शिवाय फोटोत आई-वडील, बहीण देखीलदिसत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या या गाडीवर राधा-कृष्णाची प्रतिमादेखील पाहायला मिळत आहे आणि ही प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रुचिराने घेतलेल्या या नवीन गाडीनिमित्त तिला मराठी मनोरंजण विश्वातील अनेक कलाकारांनी शुभेचहा देत तिचे कौतुक केले आहे. रुचिराच्या चाहत्यांनी तिला “अभिनंदन, तुझा खूप अभिमान आहे, “रुचिरा तुझं अभिनंदन, अशीच कायम पुढे जात रहा, अजून एक स्वप्न तू पूर्ण केलंस”, अशा अनेक प्रतिक्रिया देत तिचे कौतूक केले आहे.
दरम्यान, रुचिराने ठरलं तर मग’च्या आधीही मालिकाविश्व गाजवले आहे. यापूर्वी ती ‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती. या मालिकेत रुचिराने मायाची भूमिका साकारली होती. अशातच काही दिवसांपूर्वी रुचिरा ‘ठरलं तर मग’ मालिकेत छोट्या भूमिकेत झळकली. तिने अर्जुन सुभेदारच्या मैत्रीणीची भूमिका निभावली होती.