शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निसर्गाच्या सानिध्यात ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बांधलं स्वतःचं घर, म्हणाली, “देवाला, नशिबाला दोष देतो पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 21, 2023 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tharla tar mag fame actress priyannkka tendolkar shared photo and video of her new farmhouse on instagram

निसर्गाच्या सानिध्यात 'ठरलं तर मग' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बांधलं स्वतःचं घर, म्हणाली, "देवाला, नशिबाला दोष देतो पण..."

‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल आहे. या मालिकेतील मुख्य कलाकारांव्यतिरिक्त सहाय्यक भूमिका व खलनायकाच्या भूमिका साकारणारे कलाकारही प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर ही मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असली तरी तिची भूमिकाही प्रेक्षकांना आवडत आहे. (Actress Priyannkka Tendolkar Shared Video On Instagram)

या मालिकेच्या निमित्ताने खलनायिका म्हणून काम करण्याचे तिचे एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तिच्या नव्या घराचे स्वप्नदेखील पूर्ण झाले आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने नवीन घराची एक खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. या व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये तिच्या अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती झाली असल्याचे तिने म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyannkka Tendolkar (@priyanka_tendolkar)

आणखी वाचा – “सत्यनारायणाची पूजा, औक्षण, पाहुणचार अन्…”, अमृता देशमुखच्या माहेरी नव्या जोडप्याचं असं झालं स्वागत, लग्नानंतरचे फोटो आले समोर

प्रियांकाने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटल आहे की, “खूप वर्षांपासून जे स्वप्नं बघितलं ते २ वर्षांपूर्वी पूर्ण झालं. पण ते खऱ्या अर्थानं पूर्ण झालं आहे हे मात्र मला २ दिवसांपूर्वी लक्षात आलं. आपण स्वप्नं पाहतो ते पूर्ण करायला पळतो, कष्ट घेतो. मग ती स्वप्न लवकर पूर्ण होत नाहीत म्हणून देवाला, नशिबाला दोष देतो. मग कुठे ते पूर्ण होतं. पण या गोष्टीसाठी इतकी वाट पाहिली की ते कधी पूर्ण झाल कळलंच नाही. २ दिवसांपूर्वी ही जाणीव झाली की, ही सुंदर वास्तू, इथली झाडं, फुलं सगळी आपली आहेत. हा व्हरांडा जो काही वर्षांपूर्वी फक्त स्वप्नात असायचा आज तिथल्या झोपाळ्यावर बसून मी माझी आवडती कॉफी पीत आहे.” यापुढे तिने “मला तुमच्या स्वप्नात सामील केल्याबद्दल व आमचं स्वप्नं पूर्ण केल्याबद्दल आई-बाबा व देवालाही धन्यवाद म्हटलं आहे.

आणखी वाचा – क्रांती रेडकरने पतीसह केलेल्या अनोख्या उपक्रमाने वेधलं लक्ष, अनाथ मुलींबरोबर यंदाची भाऊबीज केली साजरी, म्हणाले, “ज्या मुलींना…”

दरम्यान, प्रियांकाच्या या व्हिडिओखाली चाहत्यांनी “वाह, अभिनंदन, शुभेच्छा, तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊदेत” अशा अनेक कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत व तिचं अभिनंदनही केलं आहे. त्याचबरोबर मालिकेतील सहकलाकार मोनिका दबडेनेही या व्हिडीओखाली “कित्ती गोड, कधी जाऊयात?” अशी मजेशीर कमेंटदेखील केली आहे.

Tags: entertainment newsmarathi entertainmentmarathi serialTharla Tar Mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Namrata Sambherao Husband Birthday

"माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला", नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची स्पेशल पोस्ट, म्हणाली, "खरोखरचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.