Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे अहिल्यादेवींची सजवलेली कळशी अडगळीच्या खोलीतून आणायला पारू येते. त्यावेळेला बाहेरून कोणीतरी दिशाच्या सांगण्यावरुन कडी लावून निघून जातं. तितक्यात आदित्य येऊन पारूची सुटका करतो आणि तेव्हा पारूला खूप सुंदर दिसतेस असेही सांगतो. तेवढ्यातच प्रीतम व सावित्री पारूला शोधायला आलेले असतात. त्यानंतर पारू, सावित्री बंगल्यात येतात तेव्हा अहिल्यादेवी विचारतात की, अगं खेळ खेळून झाले तू होतीस कुठे इतका वेळ?, यावर पारू सांगते की, मी ही कळशी आणायला गेले होते. तुम्हाला सुद्धा खेळ खेळायची इच्छा आहे ना. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी उभ्याच राहतात. तर दामिनी सगळ्यांना खेळ थांबवायला सांगते.
अहिल्यादेवी म्हणतात की, तुला कोणी सांगितलं मला खेळ खेळायची इच्छा आहे. यावर पारू सांगते की, दामिनी मॅडमनी सांगितलं. यावर दामिनी पारूला ओरडते. तेव्हा अहिल्यादेवी ताडकन तिथून निघून जातात. त्यानंतर दिशा दामिनी मिळून पारुचा चांगलाच अपमान करतात. दिशा सांगते की, किर्लोस्कर कंपनीच्या त्या सीईओ आहेत आणि तू त्यांच्याकडून खेळ खेळून घेणार आहेस का?, काय बोलावं कुठे बोलावं हे तुला कळत नाही का?, दामिनी अपमान करत सगळ्यांना जायला सांगते. तितक्यातच तिथून अहिल्यादेवी आवाज देत थांबा असं म्हणतात आणि अहिल्यादेवी सुंदर अशी नऊवारी साडी नेसून आलेल्या असतात. त्या सांगतात की मी सुद्धा आज खेळ खेळणार आहे. चला तर मग खेळायला सुरुवात करूया. सगळेजण खेळ खेळू लागतात.
आणखी वाचा – पॅडीचे कपडे फेकून दिले, अंकिताला जोरात बेडवर ढकललं आणि…; Bigg Boss Marathi च्या घरात निक्कीची दादागिरी
अहिल्यादेवी त्यांची कळशी घेऊन खेळ खेळतात. तर थोड्या वेळाने दामिनी सांगते की, पारू चल आपण फुगडी घालूया मात्र सावित्री पारूला बोलवून घेते. त्यावेळेला दामिनी एका बाई बरोबर फुगडी घालते आणि मध्येच फुगडीचा जोर वाढवत तिचा हात सोडून देते आणि तिला जखमी करते. त्यानंतर दामिनी अहिल्या देवींना सांगते की, अहिल्यादेवी वहिनी आपण कधीच फुगडी एकत्र घातली नाहीये तर आपण फुगडी घालूया का?. यावर अहिल्यादेवीही फुगडी घालू लागतात. अहिल्यादेवींना बराच वेळ फुगडी घातल्यानंतर लक्षात येते की, दामिनी आता तिचा हात सोडणार आहे. त्यावेळेला अहिल्यादेवी दामिनीचा हात घट्ट पकडून ठेवतात तेव्हा दामिनीला घामच फुटतो. त्याच वेळेला पारुला सावित्रीने सांगितले असते की दामिनी फुगडी घालताना मध्येच हात सोडून देते त्यामुळे पारूला भीती वाटत असते की अहिल्या देवींना काही होणार तर नाही ना म्हणून पारू सुद्धा त्यांच्या फुगडीत सामील होते आणि तीन हाताने मिळून तिघी फुगड्या घालतात. त्याच वेळेला अहिल्यादेवी आणि पारू मिळून दामिनीचा हात सोडतात आणि तिला ढकलून देतात. अहिल्यादेवी दामिनीला म्हणतात की आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तेव्हा आपणही त्या खड्ड्यात पडू शकतो. हे तुला आधीच कळायला हवं होतं. हे ऐकल्यावर आदित्य मोहन श्रीकांत सगळेजण टाळ्या वाजवतात. तेव्हा अहिल्यादेवी त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात तुम्ही इथं काय करताय?, तेव्हा प्रीतम बाजू सांभाळत मी तुझे खेळ बघायला आलो आहे असं सांगतो. त्यानंतर ते सगळेच खाली येतात आणि एकत्र फुगडी घालतात त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी जातात.
प्रिया पारूजवळ जाते आणि पारूला प्रीतम बद्दल सांगते की, दिशा मॅडम प्रीतम सरांशी असं का वागत आहेत. त्या त्यांचा सतत अपमान करत असतात अहिल्यादेवींना तूच याच्याबद्दल सांगू शकतेस. हे ऐकल्यावर पारूलाही ती संभ्रमात पडते. त्याच वेळेला प्रियाला तिच्या भावाचा फोन येतो. कठोर शब्दात प्रियाचा भाऊ तिची चौकशी करत असतो. तेव्हा ती फोन पारूकडे देते त्यानंतर प्रिया हो मी फोटो पाहते असं म्हणत फोन ठेवते आणि सांगते की माझ्यासाठी बाबा आणि भाऊ मुलं पाहत आहेत त्यामुळे त्यांने फोन केला होता. माझ्यावर खूप प्रेम आहे अस म्हणत असली तरी प्रिया घाबरलेली असते. हे ऐकल्यावर पारू सुद्धा थोडीशी चकित होते आता मालिकेच्या पुढील भागात काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.