Tharala Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली प्रतिमाच्या खोलीत जाताच प्रिया अर्जुनकडे जाण्यासाठी आनंदी होते. प्रताप व रविराज एकमेकांनशी बोलण्यासाठी निघून जातात तेव्हा प्रिया लगेचच अर्जुनच्या खोलीत जायला निघते तेवढ्यात तिला सायली थांबवते. सायलीला प्रिया अर्जुनकडे जातं असल्याचे सांगते. सायली तिला विरोध करते, त्या दोघींमध्ये अर्जुनवरुन चांगलीच खडाजंगी होते. त्यांनतर सायली तिचा खाली येण्यासाठी हात धरते. पण प्रिया तिचे काहीही ऐकून न घेता तिचा हात झटकून देत खोलीत निघून जाते पण त्यामुळे सायलीचा तोल जाऊन ती पायऱ्यांवरुन थेट खाली पडते.
अर्जुन सायलीला पडताना पाहतो. अर्जुनच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सगळे घरातले येतात. अर्जुनला सायलीच्या कानातून रक्त येताना दिसते. हे पाहून तन्वीला म्हणजेच प्रियाला आनंद होतो, सायली मेली असेल तर आपोआप काटा निघाला असं ती मनातल्या मनात बोलते. अश्विन अर्जुनला ऍमब्युलन्सला बोलवायचे सांगतो पण अर्जुन गाडी काढून लगेच सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. प्रियासुद्धा मुद्दाम हॉस्पिटलमध्ये निघते. अर्जुनला प्रताप धीर धरायला सांगतो. प्रिया अर्जुनला मुद्दाम सायलीबद्दल खोटी सहानुभूती बोलून दाखवते.
अस्मिता पूर्णा आईला झोपायला सांगते. पूर्णा आई अस्मिताला ओरडते. एवढ्यात प्रतिमा सायलीला शोधत येते. पूर्णा आई तिला काही हवे असल्याबद्दल विचारते. पूर्णा आई प्रतिमाला चहा घेण्याचा आग्रह करते पण प्रतिमा नकार देत सायलीला शोधते. अस्मिता खरं सांगणार इतक्यात पूर्णा आई सायली मैत्रिणीकडे गेली असल्याचे सांगते. इथे हॉस्पिटलमध्ये प्रियाला नागराजचा फोन येतो पण प्रिया सायली माझ्यामुळे पडली हे सांगत नाही कारण तिला महीपतची भीती वाटते.
आणखी वाचा – अंकिताने धनंजयला नॉमिनेट केल्यानंतर बायको व आई भडकली, म्हणाल्या, “अजिबात पटलं नाही…”
आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, अश्विन सायलीच्या डोक्याला मार लागल्याने सायलीची तब्येत गंभीर होऊ शकते अशी शक्यता अर्जुनकडे वर्तवतो. आता सायलीचा जीव वाचणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.