Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला धमाकेदार सुरुवात झाल्यानंतर या खेळाला आता आणखीनच रंगत येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरुवात होऊन जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता या घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या घरात इतरांपेक्षा आपलं स्थान कसं टिकून राहिल यासाठी स्पर्धक एकमेकांना भिडत आहेत आणि घरात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी ‘बिग बॉस’कडून प्रत्यकवेळी नवनवीन टास्क देण्यात येतात आणि या टास्कद्वारे स्पर्धकांना आपलं स्थान टिकवून ठेवण्यात मदत होते. अशातच ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना नुकताच एक नवीन टास्क दिला. ज्यातून त्यांना या घरात आपलं स्थान टिकवता येणार आहे. या टास्कचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला असून या सर्व टास्कद्वारे घरातील स्पर्धकांना माणकाप्याच्या गुहेतून सोन्याची नाणी जिंकून आणायची आहेत. ज्यामुळे त्यांना या घरात टिकून राहण्यासाठी योग्य ते सामान खरेदी करता येऊ शकते. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस’च्या घरात खायचे सामान संपले असून हे सामान विकत घेण्यासाठी सर्वांना बीबी करन्सी कमवायची आहे आणि ही बीबी करन्सी जिंकण्यासाठी घरातील सदस्यांना मानकापाच्या गुहेत जाऊन सोन्याची नाणी आणायची आहेत. यासाठी सर्वांना नेमून दिलेल्या टीममध्येच व नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबरच हा टास्क पूर्ण करता येणार आहे. बीबी करन्सी मिळवण्यासाठी घरातील स्पर्धक एकमेकांमध्ये चांगलेच भिडतानाचे या प्रोमोमधून कळत आहे. या प्रोमोमध्ये एकीकडे अरबाज त्याच्याकडे करन्सी कमी असल्याचे ओरडत आहे तर दुसरीकडे निक्की दुसऱ्या टीमने मिळवलेली करन्सी अपात्र असल्याचे सांगताना दिसत आहे.
या प्रोमोमधील लक्षवेधी क्षण म्हणजे अभिजीत निक्कीची साथ सोडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून अभिजीत व निक्की यांची मैत्री घरातील सर्वच स्पर्धकांना खटकत होती. यावरून घरात राडेदेखील झाले मात्र आता तो “यापुढे मला पार्टनर बनायचं नाही” असं म्हणत तो निक्कीबरोबरची मैत्री तोडणार असल्याचे दिसून येत आहे आणि त्याचा हा निर्णय सर्वांना इतका आवडला आहे की ते त्याला सॅल्युट करताना या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे अभिजीत व निक्की यांच्या मैत्रीत फूट पडून ते दोघे वेगळे होणार का? की टास्कपुरतं त्यांच्यात भांडण होणार? आणि या संपूर्ण टास्कमध्ये संचालक निक्की योग्य निर्णय घेणार का आणि सर्व टास्क योग्यप्रकारे खेळणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. तसंच या टाकमध्ये कोणाला अधिक करन्सी मिळणार आणि कोण या घरातील सर्व सदस्यांसाठी देवदूत बनणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.