बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ मालिका संपणार?, विलास केस मर्डरबाबत सायलीचा मोठा खुलासा, म्हणाली, “शेवटचे दिवस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 2, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharala Tar Mag Not Going Off Air

'ठरलं तर मग' मालिका संपणार?, विलास केस मर्डरबाबत सायलीचा मोठा खुलासा, म्हणाली, "शेवटचे दिवस…"

Tharala Tar Mag Not Going Off Air : सध्या मालिकाविश्वातील बहुतेक मालिका नवनवीन सिक्वेन्स आणत प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत. तर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या जबरदस्त प्रोमोमुळे सर्वत्र विलास मर्डर केसची चर्चा सुरु आहे. केसचा निकाल कधी लागेल? यावर प्रेक्षकही फार उत्सुक आहेत. तर गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या विलास मर्डर केसचा आता जुलै महिन्यात अखेर निकाल जाहीर होणार आहे. ज्यामुळे लवकरच मालिका संपेल का?, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहेत. सध्या मालिकेत सायली-अर्जुनला साक्षीच्या विरोधात ठोस पुरावा सापडल्याने ते दोघेही प्रचंड आनंदी होतात. पण कोर्टात नवीन ट्विस्ट येतो.

कोर्टात आलेल्या या ट्विस्टमध्ये दामिनी कोर्टासमोर तिची ठाम बाजू मांडते आणि बोलते की अर्जुन फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेल्या या खटल्याचा निकाल लवकर लागला पाहिजे असं म्हणत कोर्टाला उत्स्फूर्त करते. ज्यामुळे कोर्टाकडून अर्जुनला फक्त ३० दिवसांची मुदत जाहीर केली जाते. आणि केसचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असं स्पष्ट म्हटलं जातं. पण लवकरच मालिका संपणार का?अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. आणि या संदभार्त सायलीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने मलिका संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा – वय, वजन वाढण्याची भीती आणि…; शेफालीच्या मृत्यूनंतर श्रीदेवीच्या कॉस्मेटिक सर्जरीमागच्या रहस्याचा अभिनेत्रीकडून खुलासा, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने मधुभाऊबरोबर पोज देत सेल्फी शेअर केली आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मधुभाऊ आणि त्यांची लाडकी साऊ ! ठरलं तर मग!! विलास खुन खटल्याचे शेवटचे ३० दिवस !! मालिका संपत नाही आहे, पण केसचा निकाल मात्र नक्की लागतोय ! नक्की बघा ठरलं तर मग !!”, असं लिहीत प्रेक्षकांच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

आणखी वाचा – रश्मी देसाईंची नवी पोस्ट नेटकऱ्यांना खटकली, चार दिवसांपूर्वीच मैत्रीण शेफालीचा मृत्यू अन्…; नेटकरी म्हणाले, “मृत्यूचे दुःख…”

आता या ३० दिवसात अर्जुन की दामिनी कोण बाजी मारणार? केस कोण जिंकणार? हे पाहणं फारच महत्वाचं ठरणार आहे. जुईने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत मालिका संपणार नसल्याने आनंद व्यक्त केला आहे.

Tags: jui gadkarimarathi serialTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Next Post
vishal aditya singh shefali jariwala

मृत्यू झाला त्याच रात्री मित्राला भेटणार होती शेफाली जरीवाला, Whatsapp चॅट व्हायरल, रात्री १० वाजता प्लॅन ठरला अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.