रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मृत्यू झाला त्याच रात्री मित्राला भेटणार होती शेफाली जरीवाला, Whatsapp चॅट व्हायरल, रात्री १० वाजता प्लॅन ठरला अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 2, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
vishal aditya singh shefali jariwala

मृत्यू झाला त्याच रात्री मित्राला भेटणार होती शेफाली जरीवाला, Whatsapp चॅट व्हायरल, रात्री १० वाजता प्लॅन ठरला अन्...

सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. २७ जूनची रात्र तिच्या कुटुंबियांसाठी जीवघेणी ठरली. मुंबईतील अंधेरी परिसरातील राहत्या घरीच शेफालीने अखेरचा श्वास घेतला. निधनाच्या दिवशीच सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. शेफालीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचपूर्वी तिचं निधन झालं असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. शेफालीच्या अंतिम संस्काराला तिच्या संपूर्ण कुटुंबियांची हालत न पाहण्यासारखीच होती. शेफालीचा पती पराग त्यागी तर ढसाढसा रडत होता. तिच्या मित्र-मंडळींनाही मोठा धक्का बसला. आता शेफालीबाबत तिच्या जवळचे कलाकार मंडळी विविध पोस्ट करत आहेत. (vishal aditya singh shefali jariwala)

शेफालीबाबत कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. प्रत्येकजण तिच्याबाबत भरभरुन बोलत आहेत. यावरुनच शेफालीचं नातं इतरांशी किती चांगलं आणि सुंदर होतं हे लक्षात येतं. आताही तिने मित्र मंडळींना भेटण्यासाठी विविध प्लॅन केले होते. विशाल आदित्य सिंहने याबाबत माहिती दिली आहे. विशाल व शेफालीने ‘बिग बॉस’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री केली होती. दरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. शेफालीचं ज्यादिवशी निधन झालं त्यादिवशी त्यांचा भेटण्याचा प्लॅन होता.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिका संपणार?, विलास केस मर्डरबाबत सायलीचा मोठा खुलासा, म्हणाली, “शेवटचे दिवस…”

आदित्यने इन्स्टाग्रामद्वारे दोघांचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले आहेत. यामध्ये दोघांनीही विकेण्डला भेटण्याचा प्लॅन केला होता. जरी नावाने विशालने तिचा नंबर सेव्ह केला होता. २५ जूनला संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास विशालने मॅसेज केला. त्यानंतर शेफालीने रविवारी सगळीकडे हॉटेल बूक असतं म्हणत २७ जून (शुक्रवारी) रात्री भेटण्याचा प्लॅन ठरवला. शुक्रवारी रात्री १० वाजता भेटायचंही ठरलं.

आणखी वाचा – “कठीण काळ अनुभवला, काही कलाकार मध्येच सोडून गेले”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका संपताच अपूर्वा नेमळेकर भावुक, म्हणाली, “टीकेचा सामना…”

विशालने लगेचच शेफालीने सांगितलेल्या प्लॅनला होकार कळवला. २७ जूनला शेफालीने घरी सत्यनारायणाची पूजाही ठेवली होती. दरम्यान पूजासाठी उपवासही धरला होता. विशाल व शेफालीच्या भेटण्याची वेळ ठरली. मात्र भेटण्यापूर्वीच तिने अखेरचा श्वास घेतला होता. या संपूर्ण घटनेमधून विशाल अजूनही बाहेर आलेला नाही. शेफालीचा तो शेवटचा मॅसेज आणि शुक्रवारी भेटण्यासाठी ठरलेला प्लॅन त्याच्या मनात कायम आहे. दोघांची शेवटची भेट अपूर्णच राहिली.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
actress mumtaz 

"प्लास्टिक सर्जरी करावी लागली तर नक्की करेल", वयाच्या ७७ व्या वर्षीही ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी घेते मेहनत, म्हणाली, "मी चार महिन्यांनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.