स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेचं कथानक जसजसं पुढे जात आहे तसतशी मालिकेत रंजक वळण येत आहेत. अशातच मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Tharal Tar Mag New Promo)
सायलीला अर्जुनचा वाढदिवस दणक्यात साजरा करताना पाहायला मिळतेय. यावेळी तिला तिच्या लहानपणीचे प्रसंग आठवू लागतात. सायली अर्जुनला वाढदिवसानिमित्त खास गिफ्टही देते. बागेतील फुलांपासून स्वत: तयार केलेलं अत्तर ती त्याला गिफ्ट देते. तसेच सायली स्वतः घरी वाढदिवसासाठी स्पेशल केक बनवते. कॉन्ट्रॅक्ट मरेज असूनही सायलीने स्वतः पुढाकार घेत अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी करते. सायलीने वाढदिवसानिमित्त केलेली तयारी पाहून अर्जुन खूप खुश होतो.
अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या रंजक कथानकाने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना सायलीला भूतकाळातील सर्व गोष्टींचा भास होत असल्याचं पाहायला मिळणार आहे. अर्जुन व सायली दोघे गाडीतून घरी येत असतात. गाडीत असल्याने सायलीला रविराज, प्रतिमा आणि तिच्या अपघातादिवशी काय घडलेलं ते पुसटसं आठवू लागतं. जेव्हा त्यांची गाडी येऊन सुभेदारांच्या अंगणात पोहोचते तेव्हा त्या आठवणी अधिक प्रकर्षाने तिला जाणवू लागतात.
आता येत्या काळात भूतकाळामुळे होणार सायलीचा त्रास अर्जुन समजून घेणार का? सायलीला भूतकाळाने पुन्हा एकदा डोकावू पाहणं सहन होत नाही आणि तिला चक्कर येते. तेव्हा अर्जुन सायलीला सांभाळून घेतो. सायलीची ही अवस्था पाहून किल्लेदारांचं रहस्य सगळ्यांसमोर येणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.