मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा आणि गुणी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अनेक मालिकांमध्ये काम करून जुईने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमधून जुईला लोकप्रियता मिळाली. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं. यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौडही अजूनही चालूच आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरीलच ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत असून तिची ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. (Jui Gadkari on Fan Question)
जुईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जुई अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते. सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेऊन चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी जुईच्या अनेक चाहत्यांनी जुईला तिच्या संबंधित काही प्रश्न विचारले.
यावेळी एका चाहत्यांनी जुईला प्रश्न करत असं विचारलं की, “ताई तुला चित्रपटासाठी विचारणा होते का? आणि होत असेल तर स्वीकारत का नाही?” यावर जुईने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत असं म्हटलं की, “विचारणा होते! पण मला हवं तसं काम नाही मिळत! म्हणुन ‘चांगल्या’ कामाची वाट बघत आहे”. या प्रश्नाबरोबरच चाहत्यांनी तिला तिच्या शिक्षणाबद्दल, लग्नाबद्दही काही प्रश्न विचारले. ज्याची जुईने अगदी खास उत्तरे दिली.
आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मध्ये आठ वर्षांनी गोविंदा व कृष्णा अभिषेक पुन्हा एकत्र, अखेर कौटुंबिक वाद मिटले?
दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. त्यामुळे आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकणारी जुई गडकरी आता मोठ्या पडद्यावर चित्रपटांमधून कधी पाहायला मिळणार? याची चाहते वाट पाहत आहेत.