ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याची घोषणा केली. रेहमान यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून ते चर्चेत आहेत. या बातमीने रहमानच्या चाहत्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर काही तासांनी ए. आर. रहमान यांनी पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्याची बातमी समोर आल्यानंतर रहमान आणि मोहिनी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. मोहिनीमुळे ए. आर. रहमानने पत्नीला घटस्फोट दिल्याचे लोकांनी म्हटले. यावर स्वत: रहमान यांनी पोस्ट शेअर केली आहे. (A. R. Rahman wife reaction)
अशातच आता त्यांची पत्नी सायरा बानोनेही या प्रकरणी अता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकांनी ए.आर रहमानचे नाव मोहिनीसोबत जोडल्यानंतर गायकाच्या पत्नीने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. “हे सर्व करणे बंद करा” असं म्हणत तिने या प्रकरणी भाष्य केलं आहे. सायरा बानोच्या वकील वंदना शाह यांनी एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये सायरा पती ए. आर. रहमानला पाठींबा देताना पाहायला मिळत आहे. या निवेदनात सायरा म्हणाली की, “मी सध्या मुंबईत आहे आणि शारीरिकदृष्ट्या थोडासा कमजोर आहे. त्यामुळे मी आतापर्यंत गप्पच होती. पण मी सर्व YouTubers आणि तमिळ माध्यमांना आवाहन करतो की कृपया ए. आर. बद्दल कोणतीही चुकीची गोष्ट पसरवू नका”.
आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मध्ये आठ वर्षांनी गोविंदा व कृष्णा अभिषेक पुन्हा एकत्र, अखेर कौटुंबिक वाद मिटले?
यापुढे ती असं म्हणाली की, “तो (रहमान) या जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहे. तो एक मौल्यवान व्यक्ती आहे. कृपया या काळात त्यांना साथ द्यावी ही विनंती. माझा त्याच्यावर अतूट विश्वास आहे, जो आयुष्यभर टिकेल. ते जसे आहेत तसे राहू द्यावेत असे मी सर्वांना आवाहन करते. जोपर्यंत आम्ही अधिकृत काहीही म्हणत नाही, तोपर्यंत कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि रहमानचे नाव इतर कोणाशीही जोडणे थांबवा. तो खरंच खूप छान माणूस आहे. त्यांचे नाव खराब करु नका”.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांनी २९ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच मोहिनी डेनेही पतीपासून घटस्फोट घेतल्याची चर्चा केली. या एकाच बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि मोहिनीमुळे रहमान आणि सायरा बानोचे नाते तुटल्याच्या अफवा पसरु लागल्या. यावर अता रहमान यांच्या पत्नीने भाष्य केलं आहे.