शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या नावाने पैशांची मागणी, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत सांगितली घटना, म्हणाला, “हा गैरप्रकार…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 2, 2024 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharala Tar Mag fame Amit Bhanushali fan club is doing financial fraud with the name of the actor

'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या नावाने पैशांची मागणी, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत सांगितली घटना, म्हणाला, "हा गैरप्रकार..."

छोट्या पडदयावरील अनेक कलाकार मंडळींना लगेच प्रसिद्धी मिळते आणि याच प्रसिद्धीमुळे या कलाकारांचे सोशल मीडियावर अनेक फॅन पेजेस कार्यरत असतात. हे फॅन पेजेस आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रत्येक गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. मात्र या फॅन पेजेसकडून कलाकाराच्या लोकप्रियतेचा व प्रसिद्धीचा फायदा घेऊन फसवणूकही केली जात असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार अभिनेता अमित भानूशालीबरोबर घडला आहे.   

छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून अभिनेता अमित भानुशाली घराघरात लोकप्रिय झाला आहे. या मालिकेमुळे त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली. याआधीही अमितने अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अर्जुन सुभेदार या पात्रामुळे अमितला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेता सोशल मीडियावर छानगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.

आणखी वाचा – Video : ‘प्यार हुआ इकरार हुआ…’, लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश व नीता अंबानींचा रोमँटिक डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्…

अशातच अमितची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अमितनच्या नावाने इन्स्टाग्रामवर एक फॅन पेज आहे. ‘अमित भानुशाली फॅनक्लब’ असं या फॅन पेजचं नाव आहे. या फॅन पेजने अमित भानुशालीच्या नावाने पैसे मागितले असून यामुळे अनेकांची फसणवुक झाली आहे. या फॅन पेजने सोशल मीडियावर काही लोकांकडून पैसे मागितले असून काही लोक या फसवणुकीला बळीही पडले आहेत.

आणखी वाचा – लेकाच्या लग्नात मुकेश अंबानींची अन्नसेवा, स्वत:च्या हाताने वाढले अन्न, अनंत व राधिकानेही घेतला सहभाग, व्हिडीओ व्हायरल

याबद्दल अमितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना सावध केले आहे. अमितने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मला या डोनेशनबद्दल काहीही माहीत नाही. कृपया कोणी पैसे पाठवू नका. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. माझा या फॅन पेजशी किंवा त्याने केलेल्या या गैरप्रकाराशी काहीही संबंध नाही. त्यामूळे माझी सर्वांना विनंती आहे की, कृपया या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे पैसे पाठवू नका किंवा त्याच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नका”.  

Tags: amit bhanushalientertainment newsmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsTharala tar magअमित भानुशालीठरलं तर मगमनोरंज बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Devoleena Bhattacharjee social media post

देवोलिना भट्टाचार्जीच्या मित्राची अमेरिकेमध्ये हत्या, आई-वडिलही नाहीत अन्…; भयानक प्रकारानंतर अभिनेत्रीची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे धाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.