रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इतकी सुंदर व गोंडस आहे मोनिका दबडेची लेक, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2025 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Monika Dabade Daughter

इतकी सुंदर व गोंडस आहे मोनिका दबडेची लेक, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

Monika Dabade Daughter :बॉलिवूड सेलिब्रिटी कपल दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंगनंतर आता मराठमोळ्या अभिनेत्रीनेही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लेकीचा चेहरा दाखविला आहे. ठरलं तर मग मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेने तिच्या लेकीचा चेहरा अखेर साऱ्यांना दाखविला आहे. यापूर्वी ती नेहमीच लेकीचे पाठमोरे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसली त्यामुळे मोनिका तिची लेक वृंदाचा चेहरा केव्हा दाखवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त साधत तिने सोशल मीडियावर नवरा-लेक आणि स्वतःचा फोटो शेअर केला आहे. आणि काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला आहे.

मोनिकाला ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अस्मिता या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर मोनिका बऱ्यापैकी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मोनिकाच्या घरी १५ मार्च २०२५ रोजी चिमुकलीचं आगमन झालं. अभिनेत्रीने नवरा अन् चिमुकल्या लेकीसह फोटो शेअर करत ही गुडन्यूज सर्वांना दिली होती. “दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो… गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो… आणि नवे पर्व सुरु १५.०३.२०२५” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

आणखी वाचा – दीपिका पदुकोण की रणवीर सिंग, दुआ कोणासारखी दिसते?, नेटकरी म्हणाले, “चेहरा वडिलांवर गेला आहे पण…”

View this post on Instagram

A post shared by Monika Dabade (@mostly_monika)

यानंतर आता अभिनेत्रीने लेकीचा फोटो शेअर करत, “सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! 🪔✨ वृंदा , मोनिका आणि चिन्मयकडून”, असं कॅप्शन देत पोस्ट केली आहे. ही पोस्ट पाहून चाहते मंडळी त्यांच्यावर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. वृंदाचा फोटो पाहून चाहते मंडळी ती तिच्या बाबांसारखी दिसतेय असं म्हटलं आहे. अनेकांनी कमेंट करत “बाबांसारखी वृंदा गोड मुलगी”, “Finally face दिसला same बाबा सारखी”, “अगदी बाबांची छाप आहे गोडुली”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता झाला बाबा, घरी चिमुकल्याचे आगमन, पहिला फोटो समोर

लग्नच्या १० वर्षांनी मोनिका आणि चिन्मय आई-बाबा झाले. आई-बाबा झाल्यानंतर ते त्यांच्या लेकीसह व्यस्त झाले. मोनिका तर लेकीला सेटवर घेऊन जात शूटिंगची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे अर्थातच तिचं भरभरुन कौतुक होताना दिसतं. घरची जबाबदारी सांभाळत मोनिका तिचं व्यावसायिक आयुष्यही सांभाळत आहे.

Tags: marathi actressmarathi serialMonika Dabade Daughter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Pankaj Dheer Latest News

"जेव्हा तुम्ही कोणाला गमावता…", पंकज धीर यांच्या निधनानंतर सून भावुक, सासऱ्यांशिवाय दिवाळी साजरी करणं जातंय जड

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.