सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जेव्हा तुम्ही कोणाला गमावता…”, पंकज धीर यांच्या निधनानंतर सून भावुक, सासऱ्यांशिवाय दिवाळी साजरी करणं जातंय जड

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2025 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pankaj Dheer Latest News

"जेव्हा तुम्ही कोणाला गमावता…", पंकज धीर यांच्या निधनानंतर सून भावुक, सासऱ्यांशिवाय दिवाळी साजरी करणं जातंय जड

Pankaj Dheer Latest News : प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते पंकज धीर आता या जगात नाहीत. पण त्यांच्या अनेक आठवणी ते मागे सोडून गेले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे सात दिवसांनी दिवाळीचा सण साजरा करण्यात आला, पण हा सण कुटुंबासाठी खूप भारी होता. पंकज धीर त्यांच्याबरोबर नसल्याने त्यांना हा सण साजरा करणंही कठीण गेलं. त्यांची सून कृतिका सेंगर हिने यानिमित्त वेदनांनी भरलेली पोस्ट शेअर केली आहे. अर्थात पंकज धीर यांच्या कुटुंबासाठी यंदाची ही दिवाळी फारच शांत आहे. पंकज धीर यांची सून आणि अभिनेत्री कृतिका सेंगर हिने सोशल मीडियावर एक गोष्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सासऱ्याशिवाय हा सण साजरा करणे किती कठीण होते हे सांगितले.

दिवाळीला लावलेल्या दिव्याचा फोटो शेअर करताना कृतिकाने लिहिले की, “जेव्हा तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावता, तेव्हाच तुम्हाला सण किती भारी वाटतात हे लक्षात येत”. या पोस्टमध्ये तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. पंकज धीर कर्करोगाशी झुंज देत होते, अशी माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र १५ ऑक्टोबर रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आणखी वाचा – दीपिका पदुकोण की रणवीर सिंग, दुआ कोणासारखी दिसते?, नेटकरी म्हणाले, “चेहरा वडिलांवर गेला आहे पण…”

त्याला निरोप देण्यासाठी सलमान खानपासून पुनीत इस्सार आणि इतर कलाकार आले होते. पंकज कॅन्सरशी लढा देत असतानाही त्यांनी काम सोडले नाही. त्यांनी चित्रपट आणि टीव्ही दोन्हीमध्ये काम केले. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारुन ते घराघरात प्रसिद्ध झाले. याशिवाय तो ‘चंद्रकांता’, ‘बडी बहू’, ‘ससुराल सिमर का’मध्ये दिसले होते. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ते ‘बादशाह’, ‘सोल्जर’, ‘जमीन’मध्ये दिसले होते.

आणखी वाचा – इतकी सुंदर व गोंडस आहे मोनिका दबडेची लेक, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

अभिनेत्याच्या पश्चात पत्नी अनिता धीर, मुलगा निकेतन धीर आणि सून कृतिका सेंगर असा परिवार आहे. निकेतनने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात नाव कमावलं आहे. शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये तो थंगबली या भूमिकेमुळे चर्चेत आला. कृतिका ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. पंकज यांना देविका नावाची तीन वर्षांची नात देखील आहे.

Tags: bollywood sad newspankaj dheerPankaj Dheer Latest News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Soham Bandekar

बांदेकरांच्या लेकाच्या 'त्या' कमेंटने वेधलं लक्ष, सोहमने दिली पूजा बिरारीवरील प्रेमाची कबुली, चर्चेला उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.