शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर निकाल लागला! साक्षी-प्रियाच्या हातात बेड्या, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा, अर्जुनच्या यशाने सायली आनंदी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 30, 2025 | 10:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tharala tar mag news updates

अखेर निकाल लागला! साक्षी-प्रियाच्या हातात बेड्या, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा, अर्जुनच्या यशाने सायली आनंदी

tharala tar mag news updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. विलास खुनाचा निकाल काय लागणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मधुभाऊ या केसमधून सुटणार का?, हा मोठा सवाल सर्वांसमोर होता. अखेर निकालाचा तो दिवस आलाच. अर्जुनने सर्वतोपरी प्रयत्न करुन ही केस लढली आणि अर्थात विजयही मिळवला. विलास खुनात साक्षी आणि प्रिया यांचा कसा हात आहे हे अर्जुनने भर कोर्टात उघड केले. अर्जुनने यावेळी संधी साधत प्रियाला निशाण्यावर ठेवलं. प्रियावर दबाव टाकला तर नक्कीच ती खरं सांगेल याची खात्री अर्जुनला होती, म्हणून तो प्रियाला उलट तपासणी करताना दिसला.

अर्जुनने प्रियावर दबाव टाकत विलासचा खून तूच केला आहेस, त्यामुळे खरं काय घडलं होतं ते आताच्या आता सांग असं म्हणतो. साक्षीने केलेल्या खुनाची शिक्षा मी का भोगू असा विचार करत प्रिया देखील खरं काय घडलं ते बोलायचं ठरवते. प्रियाचा संयम सुटतो आणि ती साक्षीच्या विरोधात सर्वकाही बोलून मोकळं होते. साक्षीला विलासवर गोळी झाडताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय असं प्रिया सांगते. तिच्या कबुलीनंतर सगळेच हादरतात. प्रियाची वागणूक पाहून रविराज किल्लेदार निराश होतात. यानंतर प्रियाला दामिनी काही प्रश्न विचारते. पण, गेली दोन वर्षे मी खोटं बोलले, साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आता शक्य नाही, असं सांगत प्रिया साक्षीनेच गोळी झाडली या मतावर ठाम राहते.

आणखी वाचा – “गेटवर नाव महाराजांचं पण समोरचं दृश्य…”, कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर भडकली, म्हणाली, “आपल्या इतिहासाचा…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

पुढे, अर्जुन शेवटचे काही प्रश्न विचारण्यासाठी साक्षीला बोलावतो, खून तुम्ही केलाय हे तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न तो तिला विचारतो. आता प्रियाने कबुली दिल्यावर साक्षीकडे नाही म्हणण्याचा पर्यायच उरत नाही. मी या माझ्या हातांनी विलासवर गोळी चालवलीये असं ती भर कोर्टात मान्य करते. याशिवाय विलासला गोळी लागल्यावर मी आश्रमातून निघून गेले आणि त्यानंतर प्रत्येक पुरावा प्रियाने मिटवला. तिनेच पिस्तुलावर मधुभाऊंचे ठसे घेतले असं साक्षी सांगते.

आणखी वाचा – ७५० इंजेक्शन्स, दोन्ही किडनी फेल आणि…; ‘नायक’मधील अभिनेत्याचा आजारपणाचा काळ, जगतोय असं आयुष्य

यानंतर अर्जुन साक्षी व प्रिया दोघी या खुनात सहभागी असल्याने दोघींना कठीणातील कठीण शिक्षा व्हावी असं म्हणतो, तर इकडे मधुभाऊ सुटले म्हणून सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहताना दिसतो. तर मधुभाऊही सुटकेचा श्वास सोडतात. प्रियाच्या वागणुकीने मात्र सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब प्रचंड रागवलेले असतात. तर इकडे केस हरल्याने दामिनीही रागात निघून जाते.

Tags: marathi serialstar pravahTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
shivani sonar new car

मालिका सुरु होण्याआधी शिवानी सोनारने दिली गुडन्यूज, आलिशान, महागड्या गाडीसह फोटो केले शेअर, म्हणाली, "माझ्या तारिणीचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.