सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गेटवर नाव महाराजांचं पण समोरचं दृश्य…”, कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर भडकली, म्हणाली, “आपल्या इतिहासाचा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 29, 2025 | 3:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita walawalkar shares angry post

"गेटवर नाव महाराजांचं पण समोरचं दृश्य…", कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर भडकली, म्हणाली, "आपल्या इतिहासाचा…"

ankita walawalkar shares angry post : ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली स्पर्धक म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिताने आजवर तिच्या मालवणी, कोकणी संवादाने रसिकांच्या मनात घर केलं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना आणि घराबाहेरही अंकिताला बरंच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती नेहमीच रसिकांच मनोरंजन करताना दिसली. सोशल मिडियावर अंकिता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच अंकिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर संताप व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटसमोर कचरा करणाऱ्यांना सुनावलं आहे.

या व्हिडीओमध्ये तिने म्हटलं आहे की, ” गेटवर नाव महाराजांचं पण समोरचं दृश्य लाजिरवाणं. एक लक्षात घ्या इतिहास फक्त पुस्तकांत नसतो, तो आपल्या आजूबाजूच्या जागांमध्येही असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आपल्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आपोआपच अभिमान आणि आदराची भावना जागी होते. परंतु आज अनेक ठिकाणी ‘शिवाजी महाराज चौक’, ‘शिवाजी महाराज गेट’अशा ऐतिहासिक नावांखाली असलेल्या जागांभोवती घाण, कचरा, निष्काळजीपणा आणि बेफिकिरीचं दु:खद चित्र दिसून येतं. किती विसंगती आहे ही, एकीकडे महाराजांचा जयघोष, दुसरीकडे त्यांच्या नावाजवळच साचलेला कचरा. हे फक्त त्या जागेचं नाही, तर आपल्या मानसिकतेचंही द्योतक आहे”.

आणखी वाचा – बायकोच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पैसे दिले नाही, तीन लाखांचा चेक बाउन्स झाला आणि…; मराठी अभिनेत्याचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

पुढे तिने म्हटलं की, “शिवरायांच्या विचारांनी चालणं म्हणजे फक्त गड किल्ले बघणं नव्हे, तर स्वच्छता, शिस्त, आणि सजग नागरिकत्व हे त्यांच्या आदर्शाचं खरे अनुकरण आहे.
मग आपण रोज ज्या गेटखालून पाटीला नमस्कार करतो, तिथं जर आपणच प्लास्टिक, घाण, थुंकी आणि कचऱ्याचा ढीग ठेवत असू तर तो नमस्कार केवळ दिखावा आहे का?. आज गरज आहे ती फक्त ‘शिवप्रेम’ बोलण्यात नसून, ते कृतीत दाखवण्याची. ‘गेटवर महाराजांचं नाव,
पण समोर कचरा,
हा अपमान नाही का आपल्या इतिहासाचा?’. आपण जर खरंच शिवरायांवर प्रेम करत असू, तर त्यांच्या नावाने असलेल्या प्रत्येक स्थळाला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ आणि सन्माननीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे”.

आणखी वाचा – “तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करावं…”, तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली, “मिठी मारली…”

शेवटी मोलाचा सल्ला देत अंकिता म्हणाली, “समाज, नगरपालिका आणि स्थानिक नागरिक सर्वांनी मिळून हे लक्षात घ्यायला हवं. शिवरायांचं नाव म्हणजे शौर्य, स्वच्छता आणि स्वाभिमान. तो आपल्या कृतीनं दाखवूया. महाराजांच्या नावाने असलेल्या गेटसमोर कचरा दिसणं, याचा आपण सर्वांनी विचार करावा अशी गोष्ट आहे. स्वतः कचरा न टाकणे आणि इतरांनाही रोखणे हीच खरी शिवप्रेमाची खरी ओळख”.

Tags: ankita walawalkarMarathi influencersocial awarness
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
actor ponnambalam kidney fail

७५० इंजेक्शन्स, दोन्ही किडनी फेल आणि…; 'नायक'मधील अभिनेत्याचा आजारपणाचा काळ, जगतोय असं आयुष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.