shivani sonar new car : कलाकार मंडळी नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह आनंदाच्या बातम्या शेअर करत असतात. कुणी गाडी घेतल्यावर तर कुणी घर घेतल्याच्या बातम्या ते नेहमीच चाहत्यांना देतात. चाहतेही या कलाकारांच्या प्रत्येक आनंदात सहभागी होत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. स्वतःच हक्काचं घर घेणं, स्वतःची गाडी घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीच हे स्वप्न पूर्ण झालं आहे. ही अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार. शिवानीने नवी कोरी गाडी घेतली असल्याचं सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं. तिच्या या आनंदाच्या बातमीनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होताना पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवानी नव्या मालिकांमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ‘तारिणी’ या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या ११ ऑगस्टपासून ही मालिका रसिकांच्या भेटीस येणार आहे. मालिका येण्यापूर्वीच आता अभिनेत्रीने नवीकोरी गाडी खरेदी केली असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. शिवानी सोनारने तिची ‘तारिणी’ ही मालिका सुरु होण्याआधी नवीन गाडी खरेदी केली आहे. नव्या गाडीचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शिवानीने या फोटोला, “अखेर माझ्या तारिणीचं आगमन झालेलं आहे” असं कॅप्शन दिलं आहे. यापुढे अभिनेत्रीने “नवीन गाडी, टाटा फॅमिली, तारिणी” असे हॅशटॅग दिले आहेत. गाडी खरेदी करण्यासाठी येताना अभिनेत्रीचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला. ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी तिने या खास प्रसंगाला नेसली होती. यावेळी तिचा पती अंबर गणपुळे व कुटुंबीय देखील उपस्थित होते. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी नव्या गाडीची पूजा करून त्यांच्या घरच्या तारिणीचं आनंदाने स्वागत केले.
आणखी वाचा – अखेर निकाल लागला! साक्षी-प्रियाच्या हातात बेड्या, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा, अर्जुनच्या यशाने सायली आनंदी
शिवानीने २१ जानेवारी २०२५ रोजी अभिनेता अंबर गनपुळेसह लग्न केले. शिवानी अंबरच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. यापूर्वी शिवानीने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता शिवानी लवकरच ‘तारिणी’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी अभिनेत्रीने गाडी घेतल्याची गुडन्यूज देत साऱ्यांचं मन जिंकलं आहे.





