tharala tar mag amit bhanushali : मालिका हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मालिकांचा प्रेक्षकवर्गही फार मोठा आहे. आणि मालिकाविश्वातील कलाकार मंडळी या प्रेक्षकवर्गाचे मनोरंजन करण्यास नेहमीच तत्पर असतात. हा, मग ते दिवस-रात्र, ऊन-वारा काहीच पाहत नाहीत. अहोरात्र, कित्येकदा घरापासून, मुलाबाळांपासून दूर राहत ही कलाकार मंडळी शूटिंग करत असतात. हल्ली तर कलाकार मंडळी १२-१२ तास शूटिंग करत असल्याचं कानावर आलेलं आहे. सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ते याबाबत सांगतात. मालिकेतील ही कलाकार मंडळी आपली भूमिका उत्तम कशी होईल यासाठी कठोर मेहनत करताना दिसतात. रोजचं चित्रीकरण असल्याने सुट्ट्या घेताना त्यांची चांगलीच धांदल होते.
अशातच मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला तर चाहते अक्षरशः डोक्यावर उचलून धरतात. अशातच काही दिवसांपूर्वी या मालिकेतील जुई गडकरी म्हणजेच सायली आजारी असल्याचं समोर आलं. मात्र, थोडासा आराम करुन ती पुन्हा कामावर परतली. यानंतर आता मालिकेतील आणखी एक कलाकार आजारपणातही शूट करत आहे.

मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली सध्या आजारी असून तो आजारपणातही शूट करत आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणि आपल्या मालिकेच्या टीमच्या कामात अढथळा येऊ नये म्हणून अमित आजारपणातही कामावर रुजू झाला आहे. अमितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांना त्याच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. १०२ ताप असतानाही अमित मालिकेच्या शूटसाठी सेटवर पोहोचला. आपल्यामुळे कोणाचाही खोळंबा होऊ नये या एकाच अर्थाने कलाकार मंडळी आजारपणातही आपलं काम करत असतात.
आणखी वाचा – “कोणाचं घर तोडायला प्रेम केलं नाही”, अरुणा इराणी यांचं लग्नाबाबत भाष्य, म्हणाल्या, “तुमचा नवरा…”
शो मस्ट गो ऑन असं म्हणत अमितने त्याच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. “१०२ ताप आहे. तरीही मी हसत-खेळत माझं काम करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी म्हणतात ना शो मस्ट गो ऑन”. अमितची ही पोस्ट पाहून त्याचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत.





