बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तोंडावर मुक्का मारला, चालत्या ट्रेनमधून लुटलं आणि…; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला भयावह अनुभव, म्हणाली, “रेल्वे हेल्पलाईनला फोन केला पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 23, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jyotsna Tamrakar Got Looted In Train

तोंडावर मुक्का मारला, चालत्या ट्रेनमधून लुटलं आणि…; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला भयावह अनुभव, म्हणाली, "रेल्वे हेल्पलाईनला फोन केला पण…"

Jyotsna Tamrakar Got Looted In Train : हल्ली तर रेल्वे अपघाताच्या बातम्या सतत कानावर पडत आहेत. इतकंच नाही तर रेल्वेत होणारी मारामारी, चोऱ्या या बातम्याही सतत कानावर येत असतात. रेल्वेतील चोऱ्यांचे प्रमाण तर अधिकच वाढले आहे. अशातच रेल्वेतील चोरीची घटना आता छत्तीसगढमधून समोर आली आहे. इतकंच नाही तर या घटनेला एका अभिनेत्रीला सामोरे जावे लागले आहे. छत्तीसगढ फिल्म इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीला लुटण्याचा प्रयत्न चालत्या ट्रेनमध्ये झाला असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री रीवा शहरातून, विलासपूरला जाणाऱ्या ट्रेननं प्रवास करत होती. त्यादरम्यान अभिनेत्रीसोबत ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे.

ज्योत्स्ना ताम्रकार असं या अभिनेत्रीचं नाव असून व्हिडिओ शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेल्या या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. शिवाय चोरी झाल्यावर तक्रार केल्यानंतरही तिच्या मदतीस पोलीस अधिकारी आले नाहीत यामुळे तिने थेट प्रशासनाला जाब विचारला आहे. ज्योत्स्नाने रेल्वे प्रशासनानं या गंभीर घटनेची दखल घेण्याची विनंती केली असून एखादी टोळी ही लूटमार करत असावी अशी शंकाही बोलून दाखविली आहे.

आणखी वाचा – “हातात कामं नसताना…”, मराठी अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर कलाकारांच्या आर्थिक समस्येबाबत बोलल्या विशाखा सुभेदार, पोस्ट व्हायरल

View this post on Instagram

A post shared by jyotsana 🕊 (manjari) (@jyotsana_avf)

अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “१९ जूनला रात्री रीवा ते विलासपूर जाणाऱ्या ट्रेनने प्रवास करत होते. रात्री जवळपास २ वाजता ट्रेन कटनी रेल्वे स्टेशनला पोहोचली. कटनी स्टेशन ट्रेनने सोडल्यानंतर काहीच किलोमीटर दूर ट्रेन आऊटरमध्ये थांबली. तेव्हाच एका व्यक्तीने खिडकीतून माझी पर्स आणि मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर त्या बदमाशाने मला डोळ्याच्या खाली मुक्का मारला. ट्रेन सुटल्यावर समजलं की कोच s1 ते s5 पर्यंत काही प्रवाशांचं सामान लुटलं. त्यामुळे इतर प्रवासीही घाबरले होते. त्यानंतर मी कशीतरी विलासपूरला पोहोचले. त्यानंतर एक तासानंतरही मला आरपीएफ आणि जीआरपीची मदत मिळाली नाही”.

आणखी वाचा – सासू-सासऱ्यांची साथ, मुलींना घडवण्यात त्यांचा हात अन्…; अलका कुबल यांना सासरची ओढ, कुटुंबालाच यशाचं श्रेय

शेवटी या घटनेनंतर तिनं रेल्वे हेल्पलाईनला फोन केला आणि त्यांना लुटण्यात आल्याचं कळवलं. अभिनेत्रीनं आरोप केला आहे की, “तक्रारीनंतरही कुणीही तिच्या मदतीला आलं नाही. विलासपूर स्टेशनला पोहोचल्यावरही तिला संबंधित अधिकाऱ्यांची बराच वेळ वाट पाहावी लागली. ट्रेनमध्येही आरपीएफ किंवा जीआरपीचा कोणताही सैनिक हजर नव्हता.

Tags: Jyotsna TamrakarLooted In Trainrobbery news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
Next Post
Sonakshi Sinha News

"सकाळी गाढ झोपेत असताना…", सोनाक्षी सिन्हाने शेअर केला भयानक किस्सा, म्हणाली, "माझ्या शरीरावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.