रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharal Tar Mag Serial :  प्रतिमाची स्मृती परत आणण्यात सुभेदार कुटुंब यशस्वी ठरणार का?, तर तन्वीमुळे सायली-अर्जुनमधील वाद वाढणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 8, 2024 | 10:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Serial todays episode

'ठरलं तर मग' मालिकेत प्रतिमाची स्मृती लवकर परत येणार का?, सुभेदार कुटुंबाचे प्रयत्न यशस्वी ठरणार का?

Tharal Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, कल्पना प्रतिमाकडे येते आणि काही वर्षांपूर्वी प्रतिमानेच दिलेले कानातले तिला दाखवत काही आठवत आहे का असं विचारते. पण प्रतिमा काहीच आठवत नसल्याचं सांगायला मान डोलावते. हे बघून पूर्णा आईला फार वाईट वाटतं. तेवढ्यात तन्वी म्हणजेच प्रिया तिथे येऊन प्रतिमाचा थेट हात पकडत आईवरच्या प्रेमाचे नाटक करते. त्यामुळे प्रतिमा जरा जास्तच घाबरते पण तेवढ्यात सायली तिथे येऊन प्रियाला प्रतिमापासून बाजूला करते.

पूर्णा आई प्रतिमाला तुला घाबरवायला ती नाही आली असल्याचे सांगते. त्यावेळी प्रतिमा खाली बसते आणि फरशीवर झोपायचं आहे असं खुणेने सांगते. हे ऐकून पूर्णा आईला खूप जास्त वाईट वाटतं. शेवटी प्रतिमा खालीच झोपते आणि सायली तिला नीट झोपवते. अस्मिता व प्रिया सायली प्रतिमाच्या अधिक जवळ जाण्यावरुन चर्चा करतात. दुसरीकडे चैतन्य हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रतिमाच्या खोट्या बॉडीच्या डीएनएबद्दल चौकशी करुन येण्याचे अर्जुनला सांगताच अर्जुन रविराज सर तिथल्या डॉक्टर डीनशी बोलणार असल्याचे चैतन्यला सांगतो आणि तिथे तितक्यात तन्वी येते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आर्या रांगडा गडी वैभवच्या प्रेमात, व्यक्त होताना ढसाढसा रडली, एकतर्फी प्रेमाची सुरुवात

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तन्वी अर्जुनला कॉफी घेऊन येत असल्याचे सांगते. सायलीला प्रतिमाच्या पिशवीत तिची लहानपणीची बांगडी सापडते. तन्वी अर्जुनला कॉफी देते आणि तो ती नाईलाजाने पण आनंदाने पिण्याचं नाटक करतो. आणि हे नेमकं सायली पाहते. सायलीला अर्जुन व तन्वीचा खूप राग येतो. तर इथे नागराज महीपतला तू मारलेली प्रतिमा परत आल्याने आता तुझ्यामुळे मीही मरणार असल्याचे सांगतो. नागराज महीपतवर प्रचंड संतापतो. महीपतसुद्धा नागराजला आवाज खाली करुन मारायची धमकी देतो.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज, पॅडी, निखिल व योगितावर नॉमिनेशनची टांगती तलवार, घरातील स्पर्धकांकडूनच झाले नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?

तर इकडे सायली रागारागात कॉफी बनवून अर्जुनला देते. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, पूर्णा आई प्रतिमाला जेवायला लोणचं पोळी आवडते म्हणून, तिच्या ताटात लोणचं वाढतात. प्रतिमाला सगळं आठवण्यासाठी सुभेदार कुटुंबाचे प्रयत्न यशस्वी ठरणार का हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
ashok saraf padma shri
Entertainment

“माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

मे 31, 2025 | 12:57 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new season Aarya and Vaibhav love story fans angry and expressed their anger through comments

Bigg Boss Marathi : "वधू वर सूचक केंद्र आहे का?", आर्याने वैभववरील प्रेम व्यक्त करताच प्रेक्षक भडकले, म्हणाले, "हे स्क्रिप्टेड आहे आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.