‘ठरलं तर मग’ मालिकेच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, अर्जुनच्या ऑफिसवर काही लोकं नासधूस करत असतात. तर नारे देत अर्जुन व चैतन्यच्या अंगावर धावून जातात. त्यातला एकजण अर्जुनला चप्पलही फेकून मारायला निघतो तेवढ्यात सायली मध्ये येते. संतापलेली सायली त्या गुंडांना पोलिसांची भीती घालते. आणि झाला सर्व प्रकार थांबवते. शिवाय जे काही त्यांनी केलं त्याचा व्हिडीओ काढून पोलिसांना दाखवायची धमकीही सायली त्या सगळ्यांना देते. त्यानंतर ते निघून जातात. चैतन्य मात्र सायलीचा हा अवतार पाहून आश्चर्यचकित होतो. सायली स्टाफला घरी पाठवण्याबाबत अर्जुनला सांगते. (Tharal Tar Mag Serial Update)
अर्जुन स्टाफला घरी जायला सांगतो. त्याचवेळी त्याला तसेच चैतन्यला बार कॉन्सिलची नोटीस येते. साक्षीने केलेल्या आरोपांच्या स्पष्टीकरणासाठी ही नोटीस असल्याचं अर्जुन सायलीला सांगतो. चैतन्य व अर्जुन निराश होऊन आपल्या केबिनमध्ये निघून जातात. इथे घरी पूर्णा आईसकट सर्वचजण काळजी करतात. पूर्णा आईच्या गोळ्याही संपल्याने अश्विन त्या आणायला जातो आणि पूर्णा आई देवी आईला मनापासून सर्व ठीक होण्यासाठी प्रार्थना करते. एकीकडे ऑफिसमध्ये अर्जुन चैतन्यला यावर मार्ग कसा काढायचा म्हणून मोठ्या पेचात पडतो. दुसरीकडे अश्विन घरुन पूर्णा आईसाठी गोळ्या आणायला जाण्यासाठी निघताना त्याच्यावर गुंड दगड मारून हल्ला करतात. इथे अर्जुन चैतन्यला एका क्षणात सर्व केस निघून गेल्याबद्दल काळजी व्यक्त करताच सायली येते आणि एक केस अजूनही हातात असून ती मधुभाऊंच्या केसची फाईल त्याच्या हातात सोपते.
अर्जुनला ही केस जिंकण्याबद्दल सायली विश्वास देते. तेवढ्यात किल्लेदार तिथे येऊन मलाही विश्वास असून घडलेला सर्व प्रकार बघून सपोर्ट करायला आल्याचं अर्जुनला सांगतो. इथे साक्षी मात्र वकील पवारांना मुद्दाम खोट्या आरोपात फसवल्याचे सांगते पण पवार, याला कायद्याचा आधार नसल्याचे साक्षीला सांगतात. तुम्हाला पैसे उगाच देत नसून लवकरच महीपतला जेलमधून बाहेर काढण्याबद्दल साक्षी पवारांना सुनावते. पण काहीही करून महीपत सुटला पाहिजे अशी बंदूक रोखून पवारांना साक्षी थेट धमकीच देते. दुसरीकडे चैतन्य व अर्जुनला किल्लेदार धीर देतो आणि मी कायम तुमच्याबरोबर असल्याचा आधारही देतो.
आणखी वाचा – पारूचं मन आदित्यमध्ये गुंततंय, एकमेकांसह फिरायलाही गेले, अखेर देणार का प्रेमाची कबुली?
बार कॉन्सिल मिटिंगला अर्जुन चैतन्यची सनद रद्द करण्याबाबत निर्णय झाला असून अर्जुन व चैतन्यचे आजवरचे काम बघून थांबावं असं त्या कमिटीला रोखले असल्याचे किल्लेदार सांगतात. शिवाय या बार कॉन्सिलला दोन- तीन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं लागणार असल्याचे आणि साक्षीचे आरोप खोटे असल्याचेही सिद्ध करावे लागणार असल्याचे किल्लेदार अर्जुन-चैतन्यला सांगतो.अर्जुन-सायली चैतन्य व किल्लेदार एकत्र या प्रकरणाचा सामना करायचे ठरवतात. अश्विनला दगड लागल्याने अस्मिता त्याला मलमपट्टी करते. तेवढ्यात अर्जुन, चैतन्य व सायली घरी येतात आणि अश्विनला असं बघून थक्क होतात. अश्विन घडलेला प्रकार सांगतो. पूर्णा आई अर्जुनला ऑफिसला सर्व ठीक असण्याबद्दल विचारते. पण अर्जुन, सायली व चैतन्य काहीच बोलत नाहीत.