शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharala Tar Mag : सायलीमुळे प्रतिमाला भूतकाळ आठवणार का?, एकमेकींना मिठी मारत रडू लागल्या अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 20, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharala Tar Mag serial update

ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाला भूतकाळ आठवणार का?, सायलीचे गाणे ऐकून अश्रूही अनावर

Tharala Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, बऱ्याच वर्षांनी सायली प्रतिमाला घरी घेऊन येते. त्यामुळे सुभेदार कुटुंब खूप खुश असतात. सायलीवर सगळेच जण खुश असतात. इतक्या वर्षांनी तिने प्रतिमाची भेट घडवून आणल्याने पूर्णा आजीही आनंदी असतात. प्रतिमा घरात रुळावी म्हणून पूर्णा आजी आणि सगळेच जण काही ना काही प्रयत्न करत असतात. तर इकडे महीपत प्रतिमा परत आल्याने हे नेमकं कसं शक्य झालं याच्याच विचारात असतो. शिवाय नागराज व प्रियावर खोट्या डेड बॉडी प्रकरणाची टांगती तलवार असते.

महिपत नागराजला म्हणतो रविराजला आता प्रतिमाची खरी बॉडी सापडायला हवी यासाठी तू काहीतरी कर. तितक्यात साक्षी म्हणते आपण प्रतिमा चा खून करणार नाही त्यावर महिपत म्हणतो नागराज याबाबतीत विचार कर आणि मला कळव. इकडे सुभेदारांच्या घरी अंताक्षरी ची तयारी सुरू असते. सगळेजण अंताक्षरी खेळण्यासाठी उत्सुक असतात. दोन टीम पाडून अंताक्षरी खेळायला सुरुवात होते. तन्वी मनात म्हणते मी प्रतिमाला घाबरून ठेवलंय त्यामुळे ती आता बाहेर येणार नाही पण या अंताक्षरीमुळे मला अर्जुनच्या जवळ जाता येणार.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “चल जा इथून”, निक्की अभिजीतबरोबर बोलल्याने अरबाजला राग अनावर, म्हणाला, “तू त्याच्याबरोबरच…”

सगळेजण एकेक गाणे गायला सुरू करतात. खोलीत प्रतिमा सगळ्यांचं गाणं ऐकत असते पण तिला बाहेर जायची इच्छा होत नाही. सायली रविराज ला म्हणते आता तुम्ही गाणं गायला हवं प्रतिमा आत्यांच्या आवडीचं एखादं गाणं गा. रविराज गाणं गायला लागतो पण मध्येच त्याला ठसका लागल्याने पुढील गाणं सायली म्हणते त्या गाण्याचा आवाज ऐकून प्रतिमा खोलीतून बाहेर येत सायलीला घट्ट मिठी मारते व दोघीही रडू लागतात. घरातील सगळेजण भाऊ होतात.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : ब्रँड अँबेसेडर म्हणून पारूचा विजय, दिशाचा खरा चेहरा आला सर्वांसमोर, अहिल्यादेवींनी घरातून हाकलून दिलं अन्…

आपण पुढील भागात पाहणार आहोत की, सायली अर्जुनला म्हणते तन्वी किती नशीबवान आहे आश्रमात राहूनही तिला तिची खरी आई सापडली. मलाही माझ्या आईला भेटून तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे.

Tags: marathi serialTharal Tar Mag Serial UpdateTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Next Post
Sonia parchure talk about how atul parchure condition during cancer treatment know more

"त्याचा आवाजही गेला अन्..." बायकोने सांगितली कॅन्सरमध्ये अतुल परचुरेंची कशी होती अवस्था?, म्हणाल्या, "वाईट वाटायचं आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.