गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तन्वी-अर्जुन निघाले अलिबागला, सायलीचा होत आहे जळफळाट, पुढे काय घडणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 19, 2024 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

तन्वी-अर्जुन निघाले अलिबागला, सायलीचा होत आहे जळफळाट, पुढे काय घडणार?

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन पूर्णा आईला प्रतिमा, रविराज यांचा विचार करुन तन्वीला माफ करण्याची विनंती करतो. अर्जुनचं हे म्हणणं ऐकून पूर्णा आई तन्वीला सुधारण्याची एक संधी देतात. यानंतर आमच्या कुटुंबाला त्रास होता कामा नये अशी सक्त समजसुद्धा पूर्णा आई तन्वीला देते. यानंतर तन्वी अर्जुनला धन्यवाद देते, अस्मिताही अर्जुनला चांगले काम केलेस असं म्हणत त्याचे आभार मानते. तन्वीमुळे पुढे जाऊन पश्चाताप व्हायला नको असे सायली बोलते. त्यावर तन्वी लगेच आपण किती साळसूत आहोत असा खोटा बिचारेपणाचा आव आणते. (Tharal Tar Mag Serial Update)

कल्पना सायलीला तन्वीच्या नादी न लागण्याचा सल्ला देते. प्रताप तन्वीला नीट वागण्याबद्दल बजावतो. तन्वी अर्जुनला पूर्णा आईवर प्रेम असल्याचे खोटे सांगते शिवाय सायली कशी चूक आहे हेही त्याला सांगते. अर्जुनही तन्वीला सायली अशीच असल्याचे मुद्दाम सांगतो. सायली कायम माझ्यावर लक्ष ठेवत असून आत्ताही दाराआडून ती बघत असल्याचे अर्जुन तन्वीला सांगतो. अर्जुन अलिबागला मिटिंगसाठी एकटाच जाण्याबद्दल तन्वीला सांगताच तन्वीसुद्धा अलिबागला त्याच्याबरोबर जाण्याबद्दल विचारते. तुझे कामं झाले की एकमेकांबरोबर जुन्या आठवणींना उजाळा देत वेळ घालवू असंही तन्वी अर्जुनला सांगते. अर्जुनही लगेच होकार देतो. सायली अर्जुनला अलिबागला जाण्याबद्दल एकदा विचार करावा असे सांगते. उलट अर्जुन यातच फायदा असल्याचे तिला सांगतो. पण सायली मात्र अर्जुनवर नाराज होते. तन्वी मुद्दाम घरी येऊन पिकअप आणि डिलिव्हरी एकाच ठिकाणी करायला सांगते.

आणखी वाचा – साधी नोकरी ते महागड्या गाड्या; तारक मेहता आता जगत आहेत असं आयुष्य, करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत अन्…

दुसरीकडे सायली अर्जुनला तिथे काय होत आहे हे दर तासाने कळवायची सूचना देते. सायलीला अर्जुन प्लॅन यशस्वी होण्याबद्दल विश्वास देतो. दुसरीकडे तन्वी अलिबागसाठी exhibition ला जायचा रविराजपुढे बहाणा करते. रविराजही तिला लगेच जायची परवानगी देतो. इथे अर्जुन तन्वीच्या आवडीचे कपडे घालतो पण सायलीला ते पटत नाही ती दुसरे कपडे त्याला काढून देते पण तो तन्वीच्याच आवडीचे कपडे घालायची जिद्द धरतो. त्यावेळी सायली मात्र त्याच्यावर चिडून हेच कपडे घालायचे असं अर्जुनला सांगते.

आणखी वाचा – अखेर चर्चा खऱ्या ठरल्या! हार्दिक-नताशा एकमेकांपासून कायमचे वेगळे, लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच मोडला संसार

सायली अर्जुनला तो अलिबागला निघताना काळजी घ्यायला सांगते. आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुनसाठी तन्वी गाडीत गजरा घेते पण तो गाडीत ठेवल्यावर त्याला शिंका सुरु होतात. त्यावर तो तिला लहानपणीचे काही आठवत नाही का असं तिला विचारताच तिला आपण माती खाल्ल्याचे समजते.

Tags: entertainmentmarathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

११ वर्ष डेट, वडिलांचा मृत्यू आणि कॅन्सरशी लढा; प्रत्येक अडथळ्यांमध्ये हिना खानला मिळाली पतीची साथ, सात फेरे घेत अडकले लग्नबंधनात

जून 5, 2025 | 11:00 am
Hina Khan Wedding
Entertainment

कॅन्सरशी झुंज तरीही हिना खानचा लग्न करण्याचा निर्णय, रॉकीसह गुपचूप केला विवाह, साडीवर ८ अंक कोरला कारण…

जून 5, 2025 | 10:37 am
Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Next Post
Bigg Boss Marathi fame actor Kiran Mane shared a post on Vishalgad encroachment case know more

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेत का?”, विशाळगड अतिक्रमणावरील सुप्रसिद्ध अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले, “मुस्लिम समाजाला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.