‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अखेर सायली व प्रतिमाची भेट झालेली असते. सायली प्रतिमाला कुटुंबाबद्दल पुन्हा पुन्हा आठवण करुन देते. पण प्रतिमाच्या काहीही लक्षात येत नाही. माहेरची व सासरची सर्व माणसं तुम्हाला भेटल्यावर तुम्हाला सर्व आठवेल त्यासाठी घरी जाऊया असा शब्द सायली प्रतिमाला देते. प्रतिमा तिला घरी येण्यास नकार देते आणि सायलीच्या हातावर तिचे नाव प्रतिमा नसून कविता असल्याचेही ती लिहून सांगायचा प्रयत्न करते. माझाच गैरसमज होतोय का या संभ्रमात आता सायली पडते. पण तरीही प्रतिमा सगळ्यांना विसरू शकली असली तरी एका व्यक्तीला नक्की ओळखेल असा सायलीला ठाम विश्वास बसतो. (Tharal Tar Mag Serial Update)
दुसरीकडे अर्जुन सायलीला फोन करायचा प्रयत्न करतो आणि सायलीचा फोन लागतो पण ती फोन उचलत नाही, त्यामुळे अर्जुन काळजीने अस्वस्थ होतो. सायली तन्वीबद्दल विचारणा करुनही प्रतिमाला तीसुद्धा आठवत नसल्याचे सांगते. सायलीला अर्जुनचे मिस्ड कॉल दिसतात, त्यामुळे ती घरी लवकर निघायचे ठरवते. दुसरीकडे नागराज महीपतकडे प्रतिमाचे चोरलेले दागिने परत मिळवण्यासाठी धडपड करतो. अखेर नागराज महीपतच्या चाव्या घेऊन त्याच्या कपाटातून सर्व दागिने पैसे आणि त्याला संशय येऊ नये म्हणून आणखी काही रक्कम चोरतो.
अर्जुन सायलीला सतत फोन करत असतो मात्र काही वेळाने सायलीचा फोन स्विच ऑफ असल्याचं दाखविण्यात येत. सायली अलिबागला प्रतिमासारख्या दिसणाऱ्या बाईला शोधायला गेली असणार हे अर्जुनच्या अचानक डोक्यात येतं. इथे नागराज रविराजच्या खोलीत येताच नेमका रविराज समोर असल्याने तो दागिने ठेवू शकत नाही. त्यामुळे खाली येताच तन्वी म्हणजेच प्रिया त्याला बरोबर पकडते. नागराज प्रियावर चिडतो.
तर इकडे अर्जुन सायलीच्या काळजीने अगदी हतबल होतो. प्रताप अर्जुनला पोलीस स्टेशनला जाऊन सायलीचा शोध घ्यायला सांगूया असं सांगतो. ते पोलीस स्टेशनला जायला निघणार इतक्यात सायली दारात येते. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, पूर्णा आई बरोबर पाहुणी कोण असं सायलीला विचारताच सायली प्रतिमाला ओढणी चेहऱ्यावरुन काढायला लावते. आता प्रतिमाला पाहून सुभेदार कुटुंबाला खूप मोठा धक्का बसतो.