‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, इन्स्पेक्टरचा फोन येताच किल्लेदार धक्क्याने कोसळतो. अर्जुन किल्लेदारला पाणी मारुन शुद्धीवर आणताच काय झालं असल्याचं किल्लेदारला विचारतो. त्यावर किल्लेदार इन्स्पेक्टरने डीएनए मॅच झाला असल्याचे सांगितल्याचे आणि प्रतिमा सोडून गेल्याचे अर्जुनला सांगतो. इथे प्रियाला नर्सचा डीएनए रिपोर्ट्सचं काम झालं असल्याचा मेसेज येतो. त्यावर नागराज व प्रिया आनंदी होतात. प्रिया किल्लेदार लवकर घरी ये, तुझी खोटी मुलगी खऱ्या बायकोसाठी रडायला तयार आहे असंही बोलून जाते. (Tharal Tar mag Serial Update)
इथे सायली व अर्जुन रविराजला पुन्हापुन्हा काय झालं असं विचारतात. तेव्हा किल्लेदार इन्स्पेक्टरच्या फोनचा सर्व खुलासा करुन सांगतो. पूर्णाआई हे सगळं खोटं आहे म्हणत खूप रडू लागते. तिला कल्पना सावरायचा प्रयत्न करते. पूर्णा आई तन्वीला भेटायचं असल्याचं कल्पनाला सांगते. अर्जुनसुद्धा घरच्यांना सर्व सांगावं लागणार असं रविराजला समजावत घराकडे निघतो. इथे प्रिया रविराजला किती वेळ मंदिरात लागतो असं पुटपुटते. त्यावर नागराज जरा धीर धर अजिबात घाई नको करु असं प्रियाला सांगतो. कधी एकदा प्रतिमा मेली हे ऐकतेय असंही प्रिया पुढे नागराजला सांगते आणि नागराजलाही असंच वाटत असल्याचं तो प्रियाला सांगतो. तेवढ्यात किल्लेदार सगळ्यांना घेऊन तिथे येतो आणि पूर्णाआजीला सर्व सांगावं लागलं असून डीएनएसुद्धा मॅच झाल्याचं तन्वीला सांगतो.
तन्वी रडून आकांततांडव करायचं नाटक करते. सायली प्रतिमाच्या फोटोकडे एकटक बघताना अचानक तिचा फोटो निसटतो आणि लगेच सायली तो सावरते. प्रतिमा जिवंत असल्याचा विश्वास घरच्यांच्या मनात होता तोच माझ्या मनात कसा आहे असं आश्चर्य ती व्यक्त करते. तन्वी प्रतिमाची साडी घेऊन येते आणि खोटं नाटक सुरुच ठेवते. अर्जुनला इन्स्पेक्टरचा पोस्टमार्टेम झाले असून बॉडी ताब्यात घेण्यासाठी फोन येतो. रविराजही बरोबर यायचं अर्जुनला सांगतात. त्यानंतर प्रतिमावर अंत्यसंस्कार केले जातात. रविराज या सगळ्यात मात्र स्वतःलाच दोषी मानतो. तन्वी रडण्याचे खोटं नाटक सुरुच ठेवते. सायली पहिल्यांदा पूर्णाआई आणि रविराज किल्लेदारांचा विश्वास ढळताना पाहते पण तिला प्रतिमाचं अस्तित्व आजूबाजूलाच आहे असं वाटते. पूर्णाआई रविराजच्या खांद्यावर डोकं टेकत रडते. रविराजसुद्धा मीच कमी पडलो असं बोलून जातो. अर्जुन सायलीला ठीक असल्याचं विचारताच, गेलेल्या प्रतिमा आत्या नसून त्या आजूबाजूलाच असल्याचे सायली अर्जुनला सांगते. त्यावर अर्जुन तुलाही धक्का बसला असून स्वतःला सावरायचं असं सायलीला सांगतो. घरी येऊन सगळे सांत्वनपर बसले असताना सायली तेल घेऊन येताच तन्वी मुद्दाम तिला धक्का मारुन तिच्या हातून तेलाचा डबा पाडते.
मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत की, सायली प्रतिमाची साडी नेसून येताच पूर्णा आई प्रतिमा अशी तिला हाक मारते. त्यावर तन्वी सायलीला आईची साडी नेसल्याबद्दल खडसावते. पण पूर्णा आई राहूदे म्हणत प्रतिमाच्या फोटोला हार नको घालूया कारण सायलीत माझी प्रतिमा दिसते असं म्हणते.