‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की, अर्जुन साक्षी कल्पनाला बाळाचा विचार करत नसल्याचे कसे सांगावे याची प्रॅक्टिस करतात. शेवटी अर्जुन संध्याकाळी बघू तोवर दोघे मनात प्रॅक्टिस करु असं ठरवतात आणि अर्जुन ऑफिसला निघून जातो. एकीकडे इन्स्पेक्टर रविराजला प्रतिमाची बॉडी दाखवतो. पण बॉडीची आणि चेहऱ्याची इतकी वाईट परिस्थिती असते की, कशी ओळखणार असं रविराज इन्स्पेक्टरला सांगतो. शिवाय सुमनसुद्धा या प्रतिमा वहिनी नसल्याचे सांगते. (Tharal Tar Mag Serial Update)
प्रिया यावर कशावरुन असं विचारते. इन्स्पेक्टर प्रतिमाच्या सर्व वस्तू त्यांना दाखवतो. मात्र सुमन अशा वस्तू इतर कोणाकडेही असू शकतात असं सांगतात. तर इकडे कल्पना पेढे वगैरे घेऊन तयारीत असते. पूर्णाआई त्यावर कशाला असं सुद्धा विचारते. अर्जुन सायली छान बातमी देणार असल्याचे कल्पना सांगते. तर प्रिया प्रतिमाची बॉडी पाहून तिची आई असल्याचं मानायला तयार होत नाही. रविराजसुद्धा या मिळालेल्या वस्तू म्हणजे पुरेसे पुरावे नसल्याचे सांगतो. पुढे तो डिएनए टेस्ट हा एकमेव खरा पुरावा असल्याचे सांगतो. दुसरीकडे सायली-अर्जुनला उशीर झाल्याने फोन करुन केव्हा येणार असल्याचे विचारते. पण कल्पनाला काय सांगायचं यावरुन दोघांची पुन्हा चर्चा होते.
इथे सुमन त्या प्रतिमा नसल्याचे सांगते, त्यावर रविराज डीएनए टेस्ट करुच कारण सुमनचे म्हणणे पटले आहे असं म्हणतो. त्यावर तन्वी त्याला विरोध करते पण रविराज लॅबला तसे कळवतो. इथे अर्जुनची सर्वजण वाट पाहतात. अखेर अर्जुन येतो आणि मधुभाऊंची केस जिंकणार असल्याची बातमी सांगतो. यासाठी कुटुंबाची मदत पण लागेल त्यासाठी परवानगी पण हवी असल्याचे अर्जुन सगळ्यांना सांगतो. इथे प्रिया डीएनएच्या विषयावरुन अस्वस्थ होते. त्यावर नागराज चोवीस तासात नर्सला मॅनेज करु असं म्हणतो. यासाठी रविराजला बिझी ठेवून हे सर्व करावे लागेल असंही प्रियाला सांगतो.
दुसरीकडे सर्व कामं करुन सायली अर्जुनच्या ऑफिसला जाण्याबद्दल सांगते. पूर्णा आई आजवर इतक्या केस सोडवल्या तेव्हा आमची परवानगी नाही घेतली आजच बरी घेतली असा अर्जुनला टोमणा मारते. कल्पनाला आपण कामाबद्दल बोलत होतो याची खात्री पटवू द्यायची असं सायलीला अर्जुन सांगतो. सायली मात्र कल्पनाला खरं सांगायचंच असं अर्जुनला सांगते. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, पूर्णा आईच्या माळेचे मणी पडतात आणि हे अशुभ असल्याचे कल्पनाला सांगते.