बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुशांत सिंग राजपूतच्या घरी राहण्यासाठी गेली अदा शर्मा, भजनही गायलं, देवघराने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 8, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adah Sharma Sing Shree Ram Bhajan

Video : सुशांत सिंग राजपूतच्या घरी राहण्यासाठी गेली अदा शर्मा, भजनही गायलं, देवघराने वेधलं लक्ष

आजही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला प्रेक्षक मिस करताना दिसत आहेत. सुशांत या जगात नाही हे दुःख आजपर्यंत त्याचे कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि चाहते विसरु शकलेले नाहीत. सुशांतच्या आकस्मिक निधनाने लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळेच अनेक प्रकारच्या अफवांनाही जन्म दिला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ज्या घरात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला त्या घरातही अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे तिथे राहण्याचा विचारही इतर कोणाला करणं अशक्य झालं होतं. (Adah Sharma Sing Shree Ram Bhajan)

मात्र, आता अभिनेत्याच्या मृत्यूनंतर तब्बल चार वर्षांनी अभिनेत्री अदा शर्मा त्या घरात राहायला आली आहे. या अभिनेत्रीने सुशांत राहत असलेली अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. अभिनेत्रीने येथे राहण्याचा अनुभवही सांगितला आहे. तसेच शिफ्ट होण्यापूर्वी अदाने सुशांतच्या पूर्वीच्या घरात कोणते बदल केले आहेत हेदेखील समोर आले आहे. अशातच अदाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये अदा देवघराच्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये बसलेली दिसत आहे. आणि ती भजन गात आहे. यावेळी अभिनेत्री श्री राम यांचे भजन गाताना दिसत आहे. मराठी भाषेतील हे भजन गात अदाने देवघराला प्रसन्न करुन सोडले आहे. या व्हिडीओमध्ये अदाने तिचं हे देवघर पांढऱ्या संगमरवराने सजवलेले दिसत आहे.

आणखी वाचा – प्रसिद्ध निर्माते व रामोजी फिल्मसिटीचे मालक रामोजी राव यांचे निधन, वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सुशांत जेव्हा एका अपार्टमेंटमध्ये राहत होता, तेव्हा तो त्यासाठी दरमहा साडेचार लाख रुपये भाडे देत असे. त्याने आपले घर आधुनिक इंटेरिअरने सजवले होते. चामड्याच्या सोफ्यापासून गडद आणि हलक्या रंगाच्या भिंती, रंगीत पेंटिंग्ज, फ्रेम केलेली चित्रे आणि लाकडी वस्तू यांनी त्या वस्तूला सजवलं होतं. सोशल मीडियावर आलेल्या माहितीनुसार, अदा शर्मा चार महिन्यांपूर्वी या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली होती. या घराच्या सर्व भिंती पांढऱ्या रंगाच्या ठेवल्या असून सर्व खोल्यांमध्ये फारच कमी फर्निचर आहे. नृत्य आणि संगीत प्रेमी अभिनेत्रीने वरच्या मजल्यावर संगीत व नृत्य स्टुडिओ बांधला आहे. आणि छतावर अतिशय सुंदर टेरेस गार्डनही तयार केले.

आणखी वाचा – पारूबद्दल अहिल्यादेवींचा मोठा गैरसमज, आदित्यच्या खोलीत पाय ठेवण्यास मनाई, तर दिशाची बाजू घेतही सुनावलं अन्…

अदाने तिच्या मुलाखतीदरम्यान या घरादरम्यान भाष्य केले. यावेळी बोलताना ती म्हणाली की, अनेकांनी तिला त्या घरात जाण्यापासून रोखले होते. मात्र, तिने तिचा निर्णय घेतला होता. तिने सांगितले की, त्याला अपार्टमेंटमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा वाटली. पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो. हा रंग मन आणि शरीर शांत करण्यास मदत करतो. पांढऱ्या भिंती, सूर्यप्रकाश यामुळे या घराच्या खोल्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते.

Tags: adah sharmaAdah Sharma Sing Shree Ram Bhajansushant singh rajpur homesushant singh rajput
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Kangana Ranaut slapped by CISF constabl People offer jobs

कंगणा रणौतला कानाखाली मारलेल्या CISF महिलेच्या मदतीसाठी धावले लोक, कुणाकडून नोकरीची ऑफर तर कुणाकडून कायदेशीर मदत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.