‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, सायली अर्जुनला खोलीत कॉफी आणून देते आणि स्वतः लिहिलेली डायरी त्याला मनात जे असेल ते लिहायला देते. आणि सांगते की, तुमची इतकी चिडचिड का होतेय ते तुम्ही लिहून काढा म्हणजे तुम्ही शांत व्हाल. पण अर्जुन रागात डायरी फेकून देतो. मला काम जास्त असल्याने कामाचं खूप जास्त प्रेशर असल्याचं सायलीला सांगतो आणि माझ्या मध्येमध्ये न येता खाली जाऊन बस, असं अर्जुन सायलीला सांगतो. घडल्या प्रकाराबद्दल अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि मनोमन तो सायलीची माफी मागतो. (Tharal Tar Mag Serial Update)
सायली उदास चेहऱ्याने परत आलेली बघून कल्पनाला काहीतरी बिनसल्याची शंका येते, त्यामुळे ती सायलीकडे परत आणलेल्या कॉफीबद्दल विचारणा करताच सायली सांगते, त्यांना खूप काम आहे आणि त्यांना कामाचं प्रेशर आलं आहे. त्यामुळे त्यांनी कॉफी घ्यायला नकार दिला असल्याचं सांगते. यावर कल्पना मी माझ्या पद्धतीने अर्जुनला समजावते असं सायलीला सांगते. एकीकडे अर्जुन सायलीच्या लग्नाबद्दल काहीच पुरावे हाती न लागल्याने तन्वीची खूप चिडचिड होते. तेवढ्यात तिला गोरे बाईंना फोन करायचं सुचतं.
तन्वी गोरे बाईंना फोन करुन कामासाठी भेटण्याचे सांगते. दुसरीकडे अर्जुनला कल्पना सायलीशी तुसडेपणाने वागल्याबद्दल सज्जड दम भरते. शिवाय यापुढे तुझ्याकडून सायलीला अशी वाईट वागणूक मिळाल्यास माझ्याशी गाठ असल्याचंही कल्पना अर्जुनला बजावते. यावर अर्जुन माफी मागतो. कल्पना मात्र सायलीची माफी मागायला सांगते. कल्पनाने सांगितलेलं खऱ्या नवरा बायकोसाठी असून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी नाही त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायला अर्जुन सायलीला सांगतो. पण कॉन्ट्रॅक्टमध्ये तुला दुखवायचं नाही अशी अट असल्याने तुला यापुढे असं दुखावणार नाही असं सांगून अर्जुन सायलीची माफी मागतो.
दुसरीकडे साक्षी व चैतन्य साखरपुड्याचे फोटो पाहतात. अर्जुन ऑफिसला निघताना सायली नाश्ता आणून देते पण अर्जुन नाश्ता बाजूला ठेवून तिला निघून जायला सांगतो. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अर्जुनला सायलीशी त्याच्या अशा वागण्याबद्दल खूप वाईट वाटतं. शिवाय खूप दिवसांनी मालिकेत कुसुमची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. यावेळी सायली कुसुमकडे स्वतःचं मन मोकळं करते. आणि सांगते की ती अर्जुनच्या प्रेमात पडली आहे. पण त्यांचं तिच्यावर प्रेम नसल्याचं सांगते. तर इकडे अर्जुनला असं वाटतं की, सायलीचं ही त्याच्यावर प्रेम नाही.