‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली पूर्णा आईच्या खोलीत जाऊन अर्जुन आणि तुमच्यातील दुरावा दूर होण्यासाठी आपण एक प्लान करुया असं सांगते. पूर्णा आई सायलीच्या प्लॅनमध्ये सहभागी व्हायचं बोलतात. सायली म्हणते गेल्या वेळेस तुम्ही आजारी असल्याचं नाटक केलं होतं आत्ताही तुम्ही आजारी असल्याचं नाटक करा म्हणजे अर्जुन सर तुमच्याशी बोलायला लागतील. इकडे प्रिया, महिपत, साक्षी आणि नागराज यांची शाळा घेते. त्यांना व्हिडीओवरुन ब्लॅकमेलही करु लागते. प्रियाच्या या वागण्याचा साक्षी, महीपतला त्रास होतो. (Tharal Tar Mag Serial Update)
तर इकडे अर्जुन घरी आल्यावर सायलीला हाक मारतो. सायली पूर्णा आईच्या खोलीतून बाहेर येत अर्जुन वर चिडते. काही वेळाने पूर्णा आई बाहेर येतात व रडू लागतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी रविराज व सुमन, प्रिया व नागराज यांची वाट बघतात. प्रिया रविराजला इमोशनल ब्लॅकमेल करते. तर इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णा आई आजारी असल्याचं नाटक करायला लागतात. त्यावेळी सगळे त्यांची काळजी घेतात पण पूर्णा आई म्हणतात माझा नातू माझ्याशी बोलत नाही तर मी जगून तरी काय करु.
सायली अर्जुनला हाक मारते. आणि बोलावून घेते. घरातील सगळेचजण खूप पॅनिक होतात. सगळे म्हणतात पूर्णा आईला आपण लगेच हॉस्पिटलला घेऊन जाऊयात. यावर पूर्णा आई म्हणतात नाही नाही नको. पूर्णा आई नाटक करत असल्याचं अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुनही नको नको ते बोलू लागतो. हे पूर्णा आईंना सहन होत नाही. सगळ्यांच्या लक्षात येतं की पूर्णा आई नाटक करत आहेत.
अर्जुन पूर्णा आईला म्हणतो आज या नाटकात तू एकटीच नाहीस तर माझी बायको ही सामील आहे. अर्जुन पूर्णा आईला समजावतो व हा नातू कायम तुझ्याबरोबर आहे असं वचन देतो. तुला काहीच होऊ देणार नाही असंही तो म्हणतो. आता मालिकेच्या पुढील भागात पूर्णा आई सायलीची माफी मागतात व सुभेदारांच्या घराच्या किल्ल्या नातसून म्हणून तिच्या हाती देतात.