‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण असे पाहणार आहोत की, विलासगोळीबार प्रकरणाची कोर्टात केस सुरु असते. अर्जुन साक्षी विरोधात पुरावे घेऊन कोर्टात हजर असतो. मात्र याची साक्षीला जराही खबर नसते. अर्जुन कोर्टासमोर साक्षीविरोधी पुरावा म्हणून साक्षी व महिपतची व्हिडीओ सादर करतो. या व्हिडीओमध्ये महीपत साक्षीला नाटक कसं करायचं हे सविस्तर सांगताना दिसतो. हे बघून साक्षी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा करते. (TharaL Tar Mag Serial Update)
यावर चैतन्य साक्षीच्या बाजूने बोलण्यासाठी अर्जुनच्या मुद्द्यावर ऑब्जेक्शन घेत पुरावा सिद्ध करुन दाखवायला अर्जुनला सांगतो. साक्षी हा व्हिडीओ अर्जुनने मुद्दाम बनवून घेतल्याचा आरोप ती अर्जुनवर करते. पण त्यावर अर्जुन महीपत व साक्षीचा आवाज खोटा असूच शकत नाही, असं ठामपणे ठणकावून सांगतो. त्यावर साक्षी आय विटनेसबद्दल विचारणा करते. तेव्हा अर्जुन साक्षीदार शिवानी जाधवला साक्ष देण्यासाठी बोलवून घेतो. अर्जुनने विचारणा केल्यावर साक्षी तिच्या घरी आल्याचं शिवानी जाधव सांगते.
त्यावर अर्जुन मात्र, मागच्यावेळी तर साक्षी तुम्हाला रस्त्यात भेटल्याचं सांगितलं असल्याची आठवण करुन देतो. शिवानी मागची सर्व साक्ष खोटी असल्याचं कबुल करते. त्यावर चैतन्य शिवानी मागील वेळीसुद्धा असंच बोलून खरं असल्याचं सांगत होती. दरवेळी अशी साक्ष बदलत असल्यास या साक्षीदारावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न कोर्टासमोर उपस्थित करतो. शिवानी जाधव आपली परिस्थिती बेताची असून आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे असल्याने साक्षीने ते पैसे एकरकमी दिले असल्याचं सांगते, कारण शिवानीचा मामा महिपतकडे काम करत असल्याची कबुलीसुद्धा शिवानी देते.
शिवानीला पैसे देऊन अर्जुनने सादर केलेला पुरावा म्हणून जो व्हिडीओ आहे त्या व्हिडीओसाठी खोटी साक्ष द्यायला साक्षीने सांगितल्याचंही ती सांगते. त्यावर पुन्हा चैतन्य ऑब्जेक्शन घेत शिवानीकडे साक्षीचा पुरावा मागतो. साक्षी शिवानीच्या घरी जाऊन आईच्या ऑपरेशनसाठी पैसे देऊन दबावाने खोटी साक्ष द्यायला कशी लावते?, हे अर्जुन घरच्या व्हिडीओवरुन सिद्ध करतो. मालिकेच्या पुढील भागांत अर्जुन संपूर्ण कोर्टासमोर विलासचा खून साक्षीनेच केला असल्याचा सबळ पुराव्यासह सिद्ध करतो.