‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस पडली आहे. प्रेक्षक या मालिकेला भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. पारू या मालिकेत गावाकडच्या एका मुली भोवती फिरणार कथानक पाहायला मिळत आहे तर अहिल्यादेवी किर्लोस्कर या पात्राचा रोष पाहणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. तर आदित्य किर्लोस्कर या पात्राचा समजूतदारपणा, संयमीपणा प्रेक्षकांना विशेष भावतोय. (Sharayu Sonawane Mangalsutra)
‘पारू’ या मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. या आधीदेखील शरयूने अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. शरयू याआधी ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. यानंतर शरयुने पारू या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतलेली पाहायला मिळाली. या मालिकेतील शरयूची पारू ही भूमिका प्रेक्षकांची आवडती असून प्रेक्षक पारूवर भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच पारू तिच्या आयुष्यातील वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच थेट लग्नाचे फोटो शेअर करत शरयूने तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाची जाहीरपणे कबुली दिली.

शरयूने निर्माता जयंत लादेसह लग्नगाठ बांधली आहे. याआधी शरयू व जयंत यांच्या साखरपुड्याची चर्चा झाली होती. त्यावेळेला तिने सोशल मीडियाद्वारे साखरपुडा उरकल्याची बातमी शेअर केली होती. मात्र त्यानंतर अभिनेत्रीने लग्नाची कोणतीच बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली नाही. थेट लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच शरयूने तिच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसह शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली. शरयू सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
शरयूने शेअर केलेल्या तिच्या नवऱ्याबरोबरच्या एका फोटोने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये शरयूच्या गळ्यातील मंगळसूत्रांने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. मॉडर्न अंदाजात शरयूने काढलेला हा फोटो असून तिच्या गळ्यातील खास मॉडर्न अंदाजातील अशा या हटके मंगळसूत्राने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शरयूच्या गळ्यातील युनिक डिझाइन असलेल्या या मंगळसूत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे.