Jui Gadkari Red Carpet Look : ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतील अव्वल मालिका आहे. आजवर या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. मालिकेत सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे. जुईने आजवर तिच्या सायली या भूमिकेतून रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. जुईला ठरलं तर मग या मालिकेतील सायली या पात्राने विशेष लोकप्रियता मिळाली आहे. सध्या मालिकेचे भाग ४५ मिनिटांचे दाखविण्यात आल्याने मालिकेतील कलाकारांची चांगलीच दमछाक होत आहे. अधिक काळ सेटवर राहिल्याने त्यांना नीट असा स्वतःला वेळ द्यायला जमत नाही आहे, वा कुटुंबाकडे, स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही आहे. आणि यामुळेच कलाकार मंडळी दमलेले आहेत.
अशातच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा २०२५ ला चित्रीकरणातून वेळात वेळ काढत ‘ठरलं तर मग’ची टीम पोहोचली होती. यावेळी थकलेल्या जुईकडे पाहून मात्र अगदी प्रसन्न वाटत होतं. या सोहळ्यासाठीच्या जुईच्या खास लूकने तर साऱ्यांच्या नजरा वळविल्या. कायमच साधी-भोळी, निरागस असणारी जुई या मॉडर्न लूकमध्येही खूप सुंदर आणि निरागस दिसत होती. या लूकचं क्रेडिट जुईला जातं. जुईची लक्षवेधी हेअरस्टाईल अधिक खास आहे. गोल्डन कलरचा गाऊन आणि त्यावर कॉन्ट्रास्ट असा ब्राऊन रंगाचा हेड बो, सॅन्डल, आणि मॅचिंग पर्स या सगळ्याची खरेदी तिने ऑनलाईन केली आहे. आणि मुख्यत्त्वे चित्रीकरणातून वेळात वेळ काढून तिने स्वतःसाठी ऑनलाईन शॉपिंग केली आहे.
नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत जुई म्हणाली की, “सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेचे ४५ मिनिटांचे भाग सुरु असल्याने आमची खूप दमछाक होतेय. आणि तरीसुद्धा आम्ही वेळात वेळ काढून पुरस्कार सोहळ्यासाठी तयार होऊन पोहोचलो आहोत. स्टार प्रवाह पुरस्कार समारंभासाठी मी खूप उत्सुक आहे आणि मला दडपणही आलं आहे. कारण जेव्हा केव्हा बक्षीस समारंभ असतं तेव्हा आपल्या पोटात गोळा येतोच. पण मी स्वतःची समजूत काढली आहे आणि आज स्टार प्रवाह परिवारातील सगळे सदस्य मला भेटणार आहेत याचा आनंद अधिक आहे. स्वतःसाठी कॉम्प्लिमेंट म्हणायचं झालं तर इथे तयार होऊन येताना मी स्वतःला नीट पाहिलंही नाही. मी खूप थकलेले आहे”.
आणखी वाचा – गुप्तांगाच्या चिंध्या, शरीरभर चावलास, तू बरोबरच केलंस कारण…
जुईबरोबरच ‘ठरलं तर मग’चे इतरही कलाकार खास अशा अंदाजात उपस्थित होते. जुईचा या सोहळ्यात परफॉर्मन्सही पाहायला मिळणार आहे. कारण चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत जुईने डान्सची प्रॅक्टिस केली असल्याचंही तिने या मुलाखतीदरम्यान सांगितलं.