शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “आई तू गेलीस आणि…”, कविता सादर करताना जुई गडकरीचं भरुन आलं मन, आईचेही डोळे पाणावले, व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 22, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari Mother Emotional

Video : "आई तू गेलीस आणि...", कविता सादर करताना जुई गडकरीचं भरुन आलं मन, आईचेही डोळे पाणावले, व्हिडीओ तुफान व्हायरल

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आघाडीची मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असून प्रेक्षक या मालिकेला विशेष पसंती देताना पाहायला मिळत आहेत. या मालिकेच्या कथानकाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर मालिकेतील कलाकार आणि त्यांचे अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. (Jui Gadkari Mother Emotional)

‘ठरलं तर मग’ मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या सायलीला म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना पाहायला मिळत आहे. जुईने आजवर तिच्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत तिने छोट्या पदड्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. नुकतीच जुईने तिच्या आईसह एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री रोहिणी निनावे यांच्या पहिल्या ‘सातवा ऋतू’ या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्याला जुईने तिच्या आईसह उपस्थिती दर्शविली.

आणखी वाचा – पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात, साधेपणाने वेधलं लक्ष, सासरकडची मंडळींचंही साधंच राहणीमान अन्…; फोटो व्हायरल

रोहिणी निनावे यांच्या निवडक कवितांचे वाचन अभिनेत्री आसावरी जोशी, जुई गडकरी, शमा निनावे, अभिनेते आस्ताद काळे, मिलिंद फाटक, प्रसाद आठल्ये यांनी केले. यावेळी जुईने आईसाठीची कविता वाचून दाखविली. आईवर आधारित कवितेचं वाचन करताना जुईची खरी आईदेखील तिथे उपस्थित होती. आई या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या कवितेचं वाचन जुईने जड अंतःकरणाने केलं. यावेळी अभिनेत्रीची आई समोर बसली होती. त्यांच्याही डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.

आणखी वाचा – Video : रस्त्यावर उभं राहून Fire पान खायला गेली आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी, तोंड उघडलं आणि पुढे काय घडलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

जुईसह तिच्या आईचा साधेपणाही प्रेक्षकांना विशेष भावला. या कार्यक्रमादरम्यानचा मायलेकींचा समोर आलेला व्हिडीओ पाहून त्यांच्यातील खास बॉण्डिंग पाहायला मिळालं. जुईची आई लेकीची काळजी घेताना दिसली. पडद्यावर जुईने साकारलेली जशी साधीभोळी व्यक्तिरेखा आहे अगदी त्याच स्वभावात मोडणारा असा जुईचा खऱ्या आयुष्यात स्वभाव आहे.

Tags: jui gadkarijui gadkari familyJui Gadkari Mother Emotionalmarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Ashok Saraf awarded Maharashtra Bhushan 2023 honored by Chief Minister Eknath Shinde

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२३’ पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.