टीआरपीच्या शर्यतीत ज्या मालिकेने तीच पहिल्या नंबर वरच स्थान सुरुवातीपासून आज पर्यंत सातत्याने टिकवून ठेवणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग. या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांचं मन जिंकलं. मालिकेचं कथानक, जुई गडकरी,अमित भानुशाली यांसारखी स्टार कास्ट यामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.(Tharal Tar Mag Episode)
सायली अर्जुनच्या जोडी त्यांच्यातील केमेस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. स्क्रीनवर चिडका बिबा असणारा अर्जुन ऑफस्क्रीन मात्र फार वेगळा आहे. सायली आणि अर्जुनच ऑफस्क्रीन बॉण्डिंग बघायला प्रेक्षकांना कायमच आवडत. मालिकेच्या सुरवातीपासूनच मालिकेत अनेक गुपित दाखवण्यात आली आहेत.त्यातलं महत्वाचं गुपित म्हणजे अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच गुपित
पाहा काय घडणार आजच्या भागात? (Tharal Tar Mag Episode)
आजच्या भागात रविराज जे काही वागला त्यासाठी पुर्णा आजी सायलीला जबाबदार धरते. परंतु अर्जुन सायलीच्या बाजूने उभा राहतो. सगळ्यांच्या बोलण्यामुळे सायलीला खूप वाईट वाटत. आणि ती रडत असते, तेवढ्यात अर्जुन खोलीत येतो आणि तो सायलीला समजवण्याचा प्रयत्न करतो.
सायली आणि अर्जुन खोलीत असतात,तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही या सगळ्यांचं बोलणं फार मनावर घेऊ नका, भावनाशून्य व्हा.त्यावर सायली अर्जुनाला म्हणते कि मला असं नाही वागत येत. आणि अर्जुन बोलता बोलता सायलीला बोलून जातो की,तुम्हला कुठे यासर्वांसोबत कायमच राहायचं आहे ही फक्त वर्षभरासाठी केलेली गुंतवणूक आहे. आणि त्यांचं हे बोलणं अस्मिता ऐकते, आणि विचारात पडते की हे दोघे खरंच नवरा बायको आहेत ना? या दोघांचं नक्की काय सुरु आहे.आता अस्मिता अर्जुन सायलीच्या अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सत्यापर्यंत पोहचेल का हे बघणं रंजक ठरणार आहे.(Tharal Tar Mag Episode)
हे देखील वाचा : अखेर संजनाने अनिरुद्धवर उगारला हात