Sandhya Naidu Shocking Revelation : सिनेसृष्टीत अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. बरेच असे कलाकार आहेत जे या विषयावर स्पष्टपणे बोलतात तर काहीजण या विषयावर बोलणं टाळतात. कास्टिंग काऊचचा अनुभव हा विशेषतः नवोदित कलाकारांना येतो. या कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. बॉलिवूड, साऊथ, मराठी आणि इतरही भाषिक क्षेत्रात या समस्येला कलाकारांना तोंड द्यावे लागते. दरम्यान, बरेच कलाकार या विरोधात आवाज उठविताना दिसतात. अशातच सुप्रसिद्ध तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला असून यामुळे बराच गदारोळ माजला आहे.
२०१८ मध्ये तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने टॉलीवूडमधील कास्टिंग काउचबद्दलचा तिचा वाईट अनुभव शेअर केला होता. यानंतर बराच गदारोळ झाला. तिच्या या खळबळजनक खुलाशाने खळबळ उडाली. श्री रेड्डी हिने रस्त्याच्या मधोमध टॉपलेसचे प्रात्यक्षिक दाखवले जेणेकरुन सर्वांना तिचे मत ऐकू येईल. श्री रेड्डी हिच्या निषेधानंतर अनेक अभिनेत्री पुढे आल्या आणि त्यांनी आपले मत उघडपणे मांडले. त्यांना इंडस्ट्रीत कशी वागणूक दिली जाते ते सांगितले.
आणखी वाचा – “जर अभिनेत्री नसती तर?…”, चाहत्याचा जुई गडकरीला थेट प्रश्न, जुई उत्तर देत म्हणाली, “मोठ्या ब्रँडमध्ये…”
अभिनेत्री संध्या नायडूही उघडपणे पुढे आल्या. पत्रकार परिषदे घेत त्या म्हणाल्या होत्या की, “मला मिळालेली बहुतेक पात्रे ही आंटी आणि आईची आहेत. ते मला दिवसा शूटिंग सेटवर अम्मा म्हणायचे आणि रात्री झोपायला बोलावायचे. त्यांच्यापैकी एकाने मला विचारले की मी कोणते वस्त्र परिधान केले आहे आणि ते पारदर्शक आहे का?”. याशिवाय अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हाही तिला कोणत्याही चित्रपटाची ऑफर दिली जाते तेव्हा तिला विचारले जाते की या भूमिकेच्या बदल्यात तिला काय मिळेल. भूमिका दिल्यानंतर तिला व्हॉट्सॲपवर चॅट करण्यास भाग पाडण्यात आले, असा दावा अभिनेत्रीने केला आहे.
आणखी वाचा – शिवानी सोनार व अंबर गणपुळेची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
तर एका अभिनेत्री सुनीता रेड्डीने सांगितले होते की, तिला शूटिंग सेटच्या बाहेर कपडे बदलावे लागले. अभिनेत्री म्हणाली, “आम्ही उघड्यावर कपडे बदलायचो. मॅनेजर आम्हाला कारवाँ वापरण्यास सांगायचे पण आमच्याकडे तशी परवानगी नव्हती. आम्हाला कीटकांसारखे वागवले गेले. त्यांनी वाईट भाषा वापरली आणि आम्हाला इकडेतिकडे फिरकू नका असे सांगितले”.