‘बिग बॉस’च्या घरात झालेली मैत्री खऱ्या आयुष्यातदेखील टिकेल की नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो. अनेक स्पर्धक फक्त शोसाठी मैत्री करताना दिसतात; मात्र शोबाहेर त्यांच्यात फारसे सख्य दिसत नाही. परंतु, काहीजण शोबाहेरही आपली मैत्री जपताना दिसतात. याचेच उदाहरण म्हणजे ‘बिग बॉस मराठी ५’ चे काही स्पर्धक. आता ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो संपल्यानंतर काही सदस्य पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी ५’ चे स्पर्धक भेटल्याचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये इरिना रुडाकोवा आणि वैभव चव्हाण यांनी कोल्हापूरमध्ये धनंजय पोवारची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. (Dhananjay Powar Welcomed Irina Rudakova)
अशातच आता धनंजय पोवारने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इरीनाचे धनंजयच्या घरात अगदी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये धनंजयच्या आई व पत्नीने इरीनाचे औक्षण केले आहे. धनंजयच्या पत्नीने इरीनाला ओवाळले असून त्याच्या आईने तिला मिठाई खाऊ घातली. यानंतर धनंजयने इरीना खास कोलापुरी भाषाही शिकवली. धनंजयने इरीना कोल्हापुरी भाषा शिकवताच इरीनाने सर्व प्रेक्षकांशी कोल्हापुरी भाषेत संवाद साधला.
यावेळी धनंजय इरीनाला भाषा शिकवत असं म्हणाली की, “नमस्कार कोल्हापुरकर. कुठं चाललायस… संपला की इशय… आई महालक्ष्मीच्या नावानं चांगभलं”. धनंजय व इरीना यांचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. “परदेशी राहुन आपली संस्कृती जपणारी” असं म्हणत धनंजयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच धनंजय व इरीना यांच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. इरीना व धनंजय यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चांगलीच मैत्री झाली होती. ‘बिग बॉस’च्या घरातच डीपीने इरीनाला कोल्हापुरी भाषा शिकवली होती.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : जहागीरदारांचं घर सोडून गेली लीला, ऐजेंना येत आहे आठवण, पुन्हा परतणार का?
दरम्यान, धनंजय व इरीना यांच्या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्समध्ये दोघांचे कौतुक केले आहे. “आम्हाला अभिमान वाटतो तुम्ही मराठी भाषा बोलता. काही लोक आहेत ते मराठी बोलत आहे”, “मराठी संस्कृती”, “डीपी दादा म्हटलं की विषय संपला”, “खूपच छान”, “लई भारी” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसंच इरीनानेही या व्हिडीओखाली “नुसतं प्रेम भावा” अशी कमेंट केली आहे.