‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी पलक सिधवानी सध्या चर्चेत आली आहे. करार मोडल्याबद्दल निर्माते अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार करत असल्याची चर्चा होती. मात्र, अभिनेत्रीने हे वृत्त फेटाळून लावले आणि खोटे असल्याचे म्हटलं आहे. पण आता नीला फिल्म प्रॉडक्शन या प्रॉडक्शन हाऊसने नोटीस पाठवल्याचे निवेदन जारी केले आहे. त्याचवेळी पलकच्या टीमनेही एक निवेदन जारी करुन निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता तिने निर्मात्यांवर मानसिक त्रास, शोषण व धमक्या दिल्याचे आरोप केले आहेत. मात्र असे आरोप लागण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीदेखील असे आरोप केले करण्यात आले आहेत. (jennifer mistry bansiwal on palak sidhwani)
काही वर्षांपूर्वी मालिकेत मिसेस रोशन सोढी ही भूमिका सकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनेदेखील मालिकेच्या निर्मात्यांवर अशा प्रकारचे आरोप केले होते. आशातक आता पलकचे प्रकरण समोर येत असतानाच जेनिफरने तिचे समर्थन केले. जेनिफरने ‘टाइम्स नाऊ’बरोबर संवाद साधला. यावेळी पलकबरोबर जे घडलं त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच पलक बरोबर जे झालं ते प्रत्येक कलाकाराबरोबर झालं आहे. तसेच जे कलाकार मालिका सोडणार असतात त्या संगळ्यांबरोबर निर्मितीसंस्था असंच करते असे त्यांनी सांगितले. जेनिफर म्हणाली की, “खरंतर निर्माते काहीही करु शकत नाहीत. ते फक्त समस्या निर्माण करतात. ते कधीही लोकांना सुखाने शांतीने जगू देत नाहीत. दीड वर्ष झालं तरीही माझे पैसे दिले नाहीत”.
तसेच पुढे म्हणाली की, “ही मालिका म्हणजे एक तुरुंग आहे. पलकला जेव्हा मालिका सोडायची होती तेव्हा निर्मात्यांनी कायदेशीर नोटिस पाठवली. तसेच तिच्या समस्यादेखील वाढवल्या.” जेनिफरने पलकचे कौतुक तसेच तिच्यावर विश्वास असल्याचेदेखील सांगितले आहे. याआधी राज अनादकट, गुरुचरण सिंह, शैलेश लोढा व इतर अनेक कलाकारांना अशा अनेक समस्यांचा सामाना करावा लागला आहे.
त्यांनी नंतर सांगितले की, “पलकबरोबरपण असा खेळ खेळतील. पण त्यांना माहीत नाही नाही की लोकांना त्यांच्या या सवयी माहीत झाल्या आहेत. ते लोक कलकारानवर अत्याचार करतात ते लोकांच्या समोर येणारच आहे”. दरम्यान आता पलक प्रकरणाला कोणते वळण लागणार हे पाहाण्यासारखे आहे.